ETV Bharat / state

'संगीतपंढरी' मिरजेत सदनिकांना शास्त्रीय रागांची नावे, बांधकाम व्यावसायिकाचे अनोखे संगीतप्रेम - संगीतपंढरी मिरज

मिरजेच्या भुमीला संगीत कलेचा शेकडो वर्षांचा वारसा आहे. ज्या भुमीत विविध घराण्यांच्या ख्यातनाम गायक-वादकांनी मनोभावे संगीतशारदेची सेवा केली, त्या संगीतपंढरी मिरजेत विविध सदनिकांना शास्त्रीय रागांची नांवे देण्यात आली आहेत. संगीतप्रेमी बांधकाम व्यवसायिक विनायक गोखले यांनी सुमारे 25 अपार्टमेंटना शास्त्रीय गायनातील प्रसिध्द अशा रागांची नावे दिली आहेत.

builder gave raga names to apartment in miraj sangali
श्री इनक्लेव
author img

By

Published : Nov 26, 2020, 8:09 AM IST

सांगली - घर, इमारती, अपार्टमेंट यांना नाव देण्याची परंपरा जुनी आहे. कुणी आपल्या आई-वडिलांचे, कुणी देवाचे, मुलाचे, गुरुचे नाव देतात. मात्र संगीत पंढरी मिरजेत एका संगीत प्रेमी बांधकाम व्यावसायिकाने आपल्या तब्बल 25 इमारतींने शास्त्रीय संगीताच्या रागांची नावे दिली आहेत. संगीतावर असणारे प्रेम आणि त्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. विनायक गोखले असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

'संगीतपंढरी' मिरजेत सदनिकांना शास्त्रीय रागांची नावे

दिग्गजांची संगीत नगरी -
मिरज शहर हे संगीत पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक दिग्गज कलाकार जन्मले, वाढले. काहींनी इथे आयुष्यभर संगीत सेवा केली. हिंदूस्थानी संगीत ज्यांनी महाराष्ट्रात आणले ते महादेवबुवा गोखले मिरजचेच सुपूत्र होते. संगीतातील भीष्माचार्य अशी ओळख असणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनीही मिरजेतच दरबार गायक म्हणून ख्याती मिळविली. त्यांच्या पायाशी बसून विष्णू दिगंबर पलूसकर, निळकंठबुवा जंगम यांनी गायनाचे धडे घेतले. विष्णू दिगंबरांकडे तयार झालेल्या प्रा. बी. आर. देवधर यांनी संगीतकलेला वेगळा आयाम मिळवून दिला. गायनाचार्य विनायकबुवा पटवर्धन यांनीही विष्णू दिगंबरांची संगीत चळवळ देशभर पसरविली. याच मिरजेच्या भूमीत ख्यातनाम गायक मल्लिकार्जून मन्सूर यांनी निळकंठबुवांकडून गायनाचे धडे घेतले. किराणा घराण्याचे अध्वर्यू गायक संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ यांची तर मिरज कर्मभूमी होती.अशा अनेक दिग्गजांच्या सुरांनी न्हाऊन निघालेली ही मिरज नगरी आहे. त्यामुळेच संगीत क्षेत्रातील विविध वाद्यांचा पुरवठा करणाऱ्या तंतूवाद्य निर्मितीचे मिरज हे माहेरघर आहे.

संगीतावर असेही प्रेम -
या मिरजेच्या भुमीला संगीत कलेचा शेकडो वर्षांचा वारसा आहे. ज्या भुमीत विविध घराण्यांच्या ख्यातनाम गायक-वादकांनी मनोभावे संगीतशारदेची सेवा केली, त्या संगीतपंढरी मिरजेत विविध सदनिकांना शास्त्रीय रागांची नावे देण्यात आली आहेत. संगीतप्रेमी बांधकाम व्यवसायिक विनायक गोखले यांनी शहर आणि परिसरातील सुमारे 25 अपार्टमेंटना शास्त्रीय गायनातील प्रसिध्द अशा रागांची नावे देण्याचा उपक्रम राबविला आहे.

शास्त्रीय संगीताची परिचय देणारा उपक्रम -
विनायक गोखले यांनी आतापर्यंत बांधलेल्या 25 हून अधिक अपार्टमेंटना शास्त्रीय रागांची नांवे दिली आहेत. यामध्ये चंद्रकंस, मालकंस, भीमपलास, बागेश्री, चारुकेशी, गंधार, केदार, मधुरंजनी, मल्हार, मारवा, मेघ, पंचम, निशाद, रागेश्री, रिषभ, सारंग, श्री, तिलंग, यमन, परमेश्वरी, मधुवंती, बीभास आणि बसंतबहार अशी नावे आहेत.

संगीताप्रती ओढ वाढवण्यासाठी वेगळा उपक्रम -
अपार्टमेंटच्या नावाच्या माध्यमातून नागरिकात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, किमान शास्त्रीय संगीतातील रागांची नांवांचा परिचय नवीन पिढीला व्हावा, यासाठी गोखले यांनी जाणीवपूर्वक अपार्टमेंटना नावे दिली आहेत. शास्त्रीय रागांच्या नावांनी झालेले अपार्टमेंटचे नामकरण हे संगीतपंढरी मिरजेतील नागरिकांच्याही पसंतीस उतरले आहे. त्यामुळे नक्कीच ही संकल्पना संगीतपंढरी मिरजेच्या नावलौकीकात भर घालणारी आहे.

हेही वाचा -पंजाबमध्ये तब्बल ३०० वर्ष जुनं वडाचं झाड..

हेही वाचा -हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, अटल बोगदा पर्यटकांसाठी बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.