ETV Bharat / state

प्रेमास नकार दिल्याने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न - व्हिडिओ कॉल

प्रेमात नकार मिळाला आणि प्रियकराने थेट तिसऱ्या मजल्यावरून प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सांगलीच्या इस्लामपूरमध्ये घडली आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची मात्र दमछाक उडाली. मात्र, वेळीच पोलिसांनी तरुणाला चलाखीने ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Oct 9, 2021, 10:44 PM IST

सांगली - प्रेमात नकार मिळाला आणि प्रियकराने थेट तिसऱ्या मजल्यावरून प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सांगलीच्या इस्लामपूरमध्ये घडली आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची मात्र दमछाक उडाली. मात्र, वेळीच पोलिसांनी तरुणाला चलाखीने ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

प्रियकराने थेट धरली जीव संपवण्याची वाट

इस्लामपूर शहरामध्ये एका तरुणाचा प्रेम वेडेपणा शहराला पाहायला मिळाला आहे. प्रेमास नकार दिल्याने नैराश्यातून तरुणाने थेट आपले जीवन संपवण्यासाठी राहत असलेले इमारतीतील तिसरा मजला गाठत आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा प्रकार नकार देणाऱ्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तो दाखवत होता. इस्लामपूर शहरातील पेठ रस्त्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या एका इमारतीत हा सर्व प्रकार घडला आहे.

व्हिडिओ कॉल करून प्रेमाची विनवणी

या इमारतील राहणारा एक तरुण हा मूळचा नेर्ले (ता. वाळवा) येथील रहिवासी आहे. त्याचे आई -वडील कामानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी राहतात. मुलगा हा एकटाच इस्लामपूरमध्ये राहतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत तो शहरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणूनही काम करतो. सहा महिन्यांपूर्वी एका तरुणीशी त्याची मैत्री झाली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोन दिवसांपूर्वी तरुणाने मैत्रीला मोबाईलवरून प्रेमाबाबत विचारणा केली. मात्र, मैत्रिणीने प्रेमास नकार दिला.

पोलिसांनी समजूत काढत घेतले तरुणाला ताब्यात

प्रेमास नकार मिळाल्यानंतर मजुनेने थेट राहत्या इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. तेथून त्याने संरक्षक भिंतीवर चढून आपल्या प्रेयसीला थेट व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रेमास होकार देण्याची विनवणी करू लागला. प्रेमाचा होकार नाही मिळाला तर आपण उडी घेऊन आत्महत्या करू, अशी धमकी तो देऊ लागला. मात्र, समोरून तरुणीने प्रेमास साफ नकार देत, तुला काय करायचे ते कर, असे उत्तर दिले. हा सगळा सिनेस्टाईल थरार सुरू असताना काही तरुणांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी इस्लामपूर पोलिसांना याची तातडीने माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या समोर हा तरुण संरक्षक भिंतीवर बसून प्रेयसीला विनवणी करत होता. पोलिसांनी अखेर तरुणाला बोलण्यात गुंग करून त्याची समजूत काढत मोठ्या चलाखीने ताब्यात घेतले.

सहा महिन्यांच्या प्रेमासाठी विसरला जन्मदात्याला

वीस वर्षीय तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. आई-वडिलांना या सर्व घटनेची माहिती मिळताच धक्का बसला. सहा महिन्यांच्या प्रेमासाठी आई-वडिलांना पोरके करणाऱ्या एकुलत्या एक मुलाच्या या कृत्याने आईच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.

हेही वाचा - तुम्हाला आर्यन-शाहरुखची चिंता, की..; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिकांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.