सांगली: गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या सांगलीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाचा मृतदेह शहरातील काळखणीमध्ये सापडला आहे.आदित्य सचिन राठोड, वय 20 राहणार, बीड असे या महाविद्यालयीन तरुणाचं नाव असून तो विश्रामबागेतील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. तो बेपत्ता असल्याबाबत नातेवाईकांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये Vishram Bagh Police मिसिंग तक्रारी दिली होती.
विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल: 2 दिवसापासून आदित्य राठोड बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये दिली होती. या मिसिंग तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस आणि स्थानीक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून बेपत्ता झालेल्या आदित्य राठोड याचा शोध सुरू झाला होता. शोध घेत असताना त्याची गाडी सांगलीच्या काळयाखणीजवळ बेवारस स्थितीत आढळून आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आदित्य बाबत चौकशी सुरू केली. मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही. आज दुपारच्या सुमारास सांगलीच्या काळ्या खणीमध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सिविल हॉस्पिटला हलविले: त्यांनी तात्काळ विशेष रेस्क्यू फोर्सला प्रचारण केलं. त्याच पद्धतीनं महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सुद्धा पाचरण करून बोटीच्या सहाय्याने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यासह महापालिकेचे अग्निशमन अधिकारी विजय पवार त्याचप्रमाणे स्पेशल रेस्क्यू टीमचे कैलास वडर व त्यांच्या टीमने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हा आदित्य असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली सिविल हॉस्पिटलला पाठवून दिला आहे.
घातपात याबाबतचा तपास: गेल्या 2 दिवस बेपत्ता असणाऱ्या आदित्य राठोड याचा कसून शोध सुरू होता. मात्र आज त्याचा मृतदेह सापडल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. तसेच काळ्या खणीत मृतदेह सापडल्याची माहिती वाऱ्याप्रमाणे पसरल्यानंतर आजूबाजूला बग्यांनी मोठी गर्दी केली. आदित्य राठोड हा विश्रामबाग येथील एका महाविद्यालयामध्ये शिकत होता. आणि दोन दिवसापासून तो बेपत्ता होता आज मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या खिशामध्ये गाडीची चावी आणि होस्टेलच्या रूमची चावी सापडून सापडली आहे .त्यामुळे तो आदित्य असल्याची खात्री सर्वांना झाली. मात्र आदित्य काळ्या खणीजवळ कसा आला. तो पडला की घातपात याबाबतचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.