ETV Bharat / state

धक्कादायक.. स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहांची तोडले जात आहेत लचके

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. आता मृतदेहांचीही विटंबना सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. इस्लामपूर याठिकाणी मृतदेहांचे कुत्र्याकडून लचके तोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

author img

By

Published : Sep 4, 2020, 7:38 PM IST

Updated : Sep 4, 2020, 8:12 PM IST

dog_attack_deathbody
मृतदेहांची ही विटंबना सुरु

सांगली - स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचे कुत्र्याकडून लचके तोडत असल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर मध्ये समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक.. स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहांची तोडले जात आहेत लचके

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. आता मृतदेहांची ही विटंबना सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. इस्लामपूर याठिकाणी मृतदेहांचे कुत्र्याकडून लचके तोडत सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भटक्या कुत्र्यांकडून थेट स्मशानभूमीत घुसून अर्धवट जळलेल्या मृतदेहांचे लचके तोडण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका सजग नागरिक आणि हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तर या घटनेनंतर इस्लामपूर प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अशा पद्धतीने मृतदेहांची विटंबना करून सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी हा खेळ सुरू असल्याचा संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मृतदेहांची नियोजन बद्दल विल्हेवाट लावावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.

Last Updated : Sep 4, 2020, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.