ETV Bharat / state

भय पुराचे...कृष्णानदी काठी बोटी तैनात; आयुक्तांसमोर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण - boats in krishna river

मान्सून दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आता पासून महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बोट प्रात्यक्षिके देखील पार पडली.

flood in sangli
पुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:19 PM IST

सांगली - मान्सून दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आता पासून महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बोट प्रात्यक्षिके देखील पार पडली.

पुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता महानगरपालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा आजपासून सक्रिय झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत कृष्णा नदीकाठच्या माई घाटावर यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी पालिकेच्या आणीबाणी सेवा विभागाकडील 9 यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक आणि साहित्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. तसेच अग्निशमन विभागाच्या तयारीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. यामध्ये यांत्रिक बोटींसोबतच पूर बधितांसाठी तात्पुरता निवारा, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन पूर्ण केले आहे.
flood in sangli
पुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

तर पुराचा धोका आणि दोन दिवसांत कृष्णेची वाढलेली पाणी पातळी लक्षात घेऊन पालिकेने आज पासून नदीकाठावर बोटी तैनात केल्या आहेत. आज पार पडलेल्या प्रात्यक्षिकांवेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे,आदी उपस्थित होते.

गतवर्षी आलेल्या महापुराची धास्ती अजूनही सांगलीकरांच्या मनात कायम आहे. पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्यास नुकसान टाळण्यासाठी नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर कऱण्याच्या सुचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.