सांगली : सांगली दौऱ्यावर असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीमध्ये आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची घरी जाऊन भेट घेतली (Chandrashekhar Bawankule met Sambhaji Bhide) आहे. या भेटी दरम्यान बंद खोलीमध्ये भिडे आणि बावनकुळे यांची वीस मिनिटे चर्चा देखील झाली (Bawankule met Sambhaji Bhide in sangli) आहे.
काय चर्चा झाली ? मात्र बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली ? या बाबतीत गुप्तता पाळण्यात आली आहे. या भेटीप्रसंगी शुभेच्छांचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrashekhar Bawankule) यांचा सत्कार देखील केला आहे. याप्रसंगी बावनकुळे यांच्यासोबत जिल्ह्यातले स्थानिक भाजपाचे नेते देखील उपस्थित होते.
भेट महत्त्वाची : नुकतेच संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबाबतीत केलेले वादग्रस्त विधान आणि त्यानंतर इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची घेतलेली भेट, यावरून भिडे वादात सापडलेले असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात (Bawankule met Sambhaji Bhide) आहे.