ETV Bharat / state

वीज बिलांची होळी करत सरकारचा निषेध; भाजपा आमदारांनी शेतात साजरी केली शिवजयंती

भाजपाच्या वतीनेही आटपाडीच्या झरे येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये शिवजयंतीत्सोव साजरा करण्यात आला. यावेळी शिवजयंती साजरी करत वीज बिलांची होळी करून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला आहे.

वीज बिलांची होळी करत सरकारचा निषेध
वीज बिलांची होळी करत सरकारचा निषेध
author img

By

Published : Feb 20, 2021, 8:53 AM IST

सांगली - भाजपा आमदारांनी शेतात शिवजयंती साजरी करत राज्य सरकारच्या वीज बिल धोरणा विरोधात आंदोलन केले. सध्या थकीत वीज बिलापोटी कृषीपंपाची वीज जोडणी तोडण्यातच येत आहे. याचा विरोध करत शिवजयंतीच्या मूहर्त साधत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वीज बिलांची होळी करून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरेही उपस्थित होते.

वीज बिलांची होळी करत सरकारचा निषेध
राज्यात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपाच्या वतीनेही आटपाडीच्या झरे येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये शिवजयंतीत्सोव साजरा करण्यात आला.

शिवरायांच्या रयतेचे पीक जाळले जात आहे-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असे आदेश होते. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून उभे पीक जाळण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून शेतामध्ये वीज बिलांची होळी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.