ETV Bharat / state

भाजपाला शेतकऱ्यांची अ‌ॅलर्जी - कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम - sangli andolan

राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात यावेळी भाजप सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील केंद्र सरकार हे काही मोजक्या मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहे. या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची अ‌ॅलर्जी आहे, अशी टीका मंत्री कदम यांनी केली आहे.

vishwajit kadam
कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम
author img

By

Published : Oct 31, 2020, 3:38 PM IST

सांगली - केंद्रातील भाजपा सरकार मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत असून भाजपाला शेतकऱ्यांची अ‌ॅलर्जी आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसकडून देशभर आज किसान अधिकार दिवस पाळून भाजपा सरकारच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा काँग्रेसच्यावतीने सांगली शहरातल्या काँग्रेस भवनमध्ये हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात यावेळी भाजप सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार हे काही मोजक्या मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहे. या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची अ‌ॅलर्जी आहे, अशी टीका मंत्री कदम यांनी यावेळी केली.

भाजपाला शेतकऱ्यांची अ‌ॅलर्जी

केंद्रानेही आपले कर्तव्य करावे

तसंच राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे, आता केंद्रानेही आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी कदम यांनी यावेळी केली. या आंदोलनात काँग्रेस नेते विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

आता विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी..
विरोधी भाजपाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टिकेबाबत बोलताना, विरोधकांनी काय केलं? असा सवाल उपस्थित करत केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांचे सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी करायला हवी. त्यामुळे विरोधी भाजपाने आपल्या सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला मंत्री कदम यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.