ETV Bharat / state

'भारत बंद' विरोधात भाजपचे थेट बांधावर जाऊन प्रति आंदोलन - miraj bharat bandh sangli latest news

केंद्र सरकारने आणलेल्या नविन कृषी कायद्याला विरोध करत दिल्लीच्या सिंघू सीमेवर मागील 13 दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली होती.

author img

By

Published : Dec 8, 2020, 6:26 PM IST

सांगली - कृृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंद विरोधात भाजपच्यावतीने मिरज येथे प्रति आंदोलन करण्यात आले. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे कृषी कायद्याबाबत प्रबोधनही करण्यात आले.

बांधावर जाऊन प्रति आंदोलन

केंद्र सरकारने आणलेल्या नविन कृषी कायद्याला विरोध करत दिल्लीच्या सिंघू सीमेवर मागील 13 दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली होती. देशभर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आली. तर याच आंदोलनाविरोधात भाजपकडून मिरजेत प्रति आंदोलन करण्यात आले.

भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली बोलवाड याठिकाणी भाजप नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रति आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. आमदार खाडे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी कायद्याबाबत असणारे माहिती पत्रक शेतकऱ्यांना दिले. तसेच सरकारचे कृषी धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांना हा कायदा समजून घेण्याची गरज आहे, याप्रकारे कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.