सांगली - चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना सांगली शहरांमध्ये घडली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. विश्रामबागच्या रेल्वे उड्डाण पुलावर ही घटना घडली. या आगीचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच सांगलीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र, या आगीत दुचाकी भस्मसात झाली आहे.
चालत्या दुचाकीने घेतला पेट, आगीत दुचाकी जळून खाक... - सांगली चालती दुचाकीला आग बातमी
जुपिटर गाडी घेऊन शिवराज माळी कुपवाड मार्गे विश्रामबागकडे रेल्वे उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी अचानक पणे त्यांच्या पायाला चटके बसू लागल्याने, त्यांनी गाडी थांबून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवराज माळी हे गाडीपासून दूर गेले आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आणि बघता बघता भीषण आगीत गाडी जळून खाक झाली.
चालत्या दुचाकीने घेतला पेट
सांगली - चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना सांगली शहरांमध्ये घडली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. विश्रामबागच्या रेल्वे उड्डाण पुलावर ही घटना घडली. या आगीचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच सांगलीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र, या आगीत दुचाकी भस्मसात झाली आहे.
Last Updated : May 4, 2022, 5:14 PM IST