ETV Bharat / state

नववर्षाच्या पहाटेच सांगलीत वाहनांची तोडफोड करत केली जाळपोळ - सांगली पोलीस

शहरात नववर्षाच्या पहाटेच चारचाकी वाहनांची तोडफोड करत ती जाळून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोन चारचाकी वाहने पेटवून देत सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील 100 फुटी रोडवर ही घटना घडली आहे.

sangli news
सांगलीत वाहनांची जाळपोळ
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:08 AM IST

Updated : Jan 1, 2020, 8:53 AM IST

सांगली - शहरात नववर्षाच्या पहाटेच चारचाकी वाहनांची तोडफोड करत ती जाळून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोन चारचाकी वाहने पेटवून देत सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील 100 फुटी रोडवर ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नववर्षाच्या पहाटेच सांगलीत वाहनांची तोडफोड करत केली जाळपोळ

हेही वाचा - चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत, ख्रिस्ती बांधवांनी केली येशूची प्रार्थना

सांगली शहरातील 100 फुटी रोडवर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची जाळपोळ करत तोडफोड केली. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी या रोडवर असणाऱ्या गाड्यांवर अचानक हल्ला केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत. एक स्कॉर्पिओ व एक मारुती कार अशी दोन चारचाकी वाहने पेटवून देण्यात आली असून यात ही दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. तर, इतर चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. गाड्यांच्या काचांवर दगड मारून ही तोडफोड करण्यात आली आहे.

sangli news
सांगलीत वाहनांची जाळपोळ

दरम्यान, ही घटना घडत असताना मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी या मार्गावरून जात होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्या व अन्य एका कुटुंबाच्या गाडीवरही दगडफेक केली आहे. यानंतर कोरी यांनी या रस्त्यावर असणाऱ्या एका पोलीस मदत केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाला पाचारण करत पेटवण्यात आलेल्या वाहनांची आग विझवली.

sangli news
सांगलीत वाहनांची जाळपोळ

हेही वाचा - नववर्षाचे उत्साहात स्वागत, मुंबईकरांचा जल्लोष

पोलिसांनी तातडीने याठिकाणी असणाऱ्या काही सीसीटीव्हीची पाहणी केली असता, एका ठिकाणी चारजण गाड्यांची तोडफोड करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

Intro:File name- mh_sng_01_gadi_tod_fod_vis_01_7203751 - to - mh_sng_01_gadi_tod_fod_img_08_7203751

स्लग - नव्या वर्षाच्या पहाटे सांगलीत वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड...

अँकर - सांगली शहरात भल्या पहाटे चारचाकी वाहने पेटवुन,तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.दोन चारचाकी वाहने पेटवून सुमारे 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे ,शहरातील 100 फुटी रोडवर ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.तर.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.Body:सांगली शहरतील 100 फुटी रोडवर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची जाळ-पोळ करत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.४ ते 5 जणांच्या टोळकयांनी 100 फुटी रोडवर असणाऱ्या गाड्यांवर अचानक हल्ले चढवले, या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत .आणि येथे असणारी एक स्कॉर्पिओ मारुती कार अशी दोन वाहने पेटवून देण्यात आली ,ज्यामध्ये दोन्ही वाहने जाळून खाक झाली आहेत.तर या रोडवरील असणारी इतर चार-चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.गाड्यांच्या कांचांवर दगड घालून ही तोडफोड करण्यात आली आहे.सुमारे 15 ते 20 गाड्यांची यावेळी तोडफोड करण्यात आली आहे. तर ही घटना घडत असताना मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी या मार्गावरुन निघाले असता,हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्या व अन्य एका कुटुंबांच्या गाडीवर ही दगडफेक केली आहे.यानंतर कोरी यांनी या रस्त्यावर असणाऱ्या एका पोलिस मदत केंद्रात जाऊन ,घटनेच्या बाबतीत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,अग्निशमन पथकाला पाचारण करत पेटवण्यात आलेले वाहनांची आग विझवली.तर पोलिसांनी तातडीने याठिकाणी असणाऱ्या काही सीसीटीव्हीची पाहणी केली असता,एका ठिकाणी चार जण गाड्यांची तोडफोड करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे.तर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.प्राथमिक तपासात दारुच्या नशेत हे कृत केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 8:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.