सांगली - कुरळप येथे सत्ताधारी व युवक क्रांती ग्रुप या दोन गटांनी परस्पर विरोधात कुरळप पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. युवक क्रांतीचे सुनिल कांबळे यांनी सत्ताधारी गटातील एकशे वीस जणांवर, तर सत्ताधारी गटातील सर्जेराव धनवडे यांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दोन गटांकडून परस्पर विरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा
कुरळप गावात विकास कामात अढथळा यावरून बऱ्याच दिवसापासून सत्ताधारी व युवक क्रांती ग्रुप या एकमेकांविरुद्ध शाब्दिक वाद होत होते. यातच कुरळप फाट्यावरील सुनील कांबळे यांनी नवबुद्ध सोसायटीच्या जागेमध्ये घातलेले चहानाश्त्याचे खोके व याच जागेमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने बांधलेले राजाराम बापू पाटील सह बँकेची एसटी पिकअप शेड हटवण्यासाठी युवक क्रांती तर पिकअप शेडला अडथळा ठरत असलेले खोके हवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न या गोष्टी दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला. यासाठी युवक क्रांतीचे सुनील कांबळे यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले होते. तर शालेय विद्यार्थी व नागरिकांची ऊन पाऊसात गैरसोय होऊ नये, म्हणून कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेले पिकअप शेड आम्ही दुरुस्ती करत असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र याच विषयावरून सत्ताधारी व युवक क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे करत आहेत.
हेही वाचा - Heavy Rain : रत्नागिरीतील राजापुरात पूरस्थिती, बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा