सातारा - चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यात ४० हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत भारत सरकारने ६५० भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणले आहे. मात्र, चीनच्या वुहान शहरात अजूनही ६० ते ७० भारतीय अडकले आहेत. ते भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये साताऱयाची अश्विनी पाटील हिचा देखील समावेश आहे.
हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण : हैदराबाद प्रमाणे कारवाई करून माझ्या मुलीला न्याय द्या..
दरम्यान, चीनमध्ये अश्विनी एकटी असल्यामुळे साताऱयातील तिच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. नुकताच अश्विनीने तिच्यासह अडकलेल्या भारतीयांना फेसबूकवरून भारत सरकारला परत आणण्याची व्हिडिओ कॉलद्वारे विनंती केली आहे. भारत सरकार याबाबत नक्की दखल घेईल, अशी आशा अश्विनीच्या आई वडिलांना आहे.