ETV Bharat / state

सिमकार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सैनिकाला तब्बल नऊ लाखांना गंडा - Kupwad MIDC Police Station

केवायसी न केल्यास तुमचे सीमकार्ड बंद होईल, असे सांगून माहिती घेऊन एका सैनिकाची तब्बल 9 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud ) करण्यात आली आहे. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात( Kupwad MIDC Police Station ) गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 14, 2021, 7:22 PM IST

सांगली - मोबाईलचे सीम कार्ड व्हेरिफिकेशनच्या ( SIM Card Verification ) नावाखाली एका सैनिकाला तब्बल नऊ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील प्रदीप राजाराम मुळीक या सैनिकाची ऑनलाइन फसवणूक ( Online Fraud ) झाली आहे. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ( Kupwad MIDC Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे.

सिम कार्ड बंद होण्याच्या भीतिने दिली माहिती

सैनिक प्रदीप मुळीक हे सुटी निमित्त मानमोडी या आपल्या गावी आले होते. दरम्यान, त्यांना तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन न केल्यास तुमचे कार्ड बंद होईल, असा संदेश अज्ञातांकडून आला. त्यानंतर मुळीक यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर केवायसी रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे, असे त्यांना सांगण्यात आले. सिम कार्ड बंद होईल या भीतीने मुळीक यांनी त्यांना केवायसीसाठीची सर्व माहिती दिली.

व्हेरिफिकेशननंतर खात्यातून पैसे गायब ...

त्यानंतर त्यांनी 7 डिसेंबर, 2021 ते 10 डिसेंबर, 2021 दरम्यान मुळीक यांच्या व त्यांच्या आईच्या बँक खात्यातून नऊ लाख 14 हजार 357 रुपये कमी झाले. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुळीक यांनी त्वरित कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्या आला आहे.

हे ही वाचा - VIDEO : शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सदाभाऊ खोत यांनी केली महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.