ETV Bharat / state

एसटीचे आणखी 46 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, शंभर जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

author img

By

Published : Nov 3, 2020, 3:43 PM IST

Updated : Nov 3, 2020, 5:07 PM IST

मुंबईतील बेस्टसाठीची सेवा स्थगीत केल्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या एसटीच्या आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर अद्यापही शंभर जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, यापूर्वी 127 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता हा आकडा 173 वर पोहचला आहे.

Mumbai Best Latest News
एसटीचे 46 कर्मचारी कोरोनाबाधित

सांगली - मुंबईतील बेस्ट बसबरोबरच एसटी बसची सेवा देणारे कर्मचारी जिल्ह्यात परतले आहेत. त्यापैकी आणखी 46 कर्मचाऱ्या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर अद्यापही शंभर जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, यापूर्वी 127 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यात आणखी 46 कर्मचाऱ्यांची भर पडल्याने, आकडा 173 वर पोहचला आहे.

मुबंईत सेवा बजावताना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये लोकलसेवा बंद असल्याने, मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाअंर्तगत एसटी बस सेवेत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सांगली जिल्ह्यातून 13 ऑक्टोबर रोजी सुमारे दोनशेहून अधिक बसेस आणि चारशेहून अधिक कर्मचारी हे बेस्टच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतर 26 ऑक्टोबरला यातील 150 कर्मचारी सांगलीत परतले होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 126 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आले होते. आता आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा आकडा 173वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये सेवा देण्यास एसटी कर्मचाऱ्यांचा नकार

100 पेक्षा अधिक चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईमध्ये काम करण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. एसटी कर्मचारी संघटनांनी देखील मुंबईमध्ये असलेले इतर जिल्ह्यातील एसटीचे कर्मचारी हे आपल्या जिल्ह्यात पाठवावेत, अशी मागणी केली होती. त्यामुळे यातील बरेच कर्मचारी आपल्या जिल्ह्यात परतले.

Last Updated : Nov 3, 2020, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.