ETV Bharat / state

जन्मशताब्दी निमित्ताने तरी अण्णाभाऊ साठेंची उपेक्षा थांबणार का? साठे कुटुंबीयांचा सवाल - अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी न्यूज

अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्टला जयंती आहे. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर साठे कुटुंबीय, दलित चळवळी व विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी सांगलीमध्ये एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबाबत नाराजी व्यक्त केली.

Annabhau Sathe
अण्णाभाऊ साठे स्मारक
author img

By

Published : Jul 29, 2020, 5:40 PM IST

Updated : Jul 30, 2020, 6:51 PM IST

सांगली - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साठे कुटुंबियांसह दलित चळवळीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. सरकारने अण्णाभाऊ साठे यांना उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोप साठे कुटुंबीयानी केला आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, त्यांचे भव्य स्मारक उभे करावे यासह विविध मागण्या साठे कुटुंबीयांनी आज सांगलीमध्ये केल्या.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबाबत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली

अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्टला जयंती आहे. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर साठे कुटुंबीय, दलित चळवळी व विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी सांगलीमध्ये एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपा सरकारकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शंभर कोटींची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. आजही त्यांची जन्मभूमी असणाऱ्या सांगलीमध्ये अण्णाभाऊंचे स्मारक होऊ शकलेले नाही. त्यांची कर्मभूमी असणाऱ्या मुंबईमध्येही स्मारकाच्या अनेक घोषणा झाल्या. मात्र त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा प्रकार अण्णाभाऊ साठे यांना उपेक्षित ठेवण्याचा आहे, असा आरोप अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी केला.

केंद्र आणि राज्य सरकारकडून अण्णाभाऊ साठेंचे साहित्य आणि विचारांचा प्रसार केला जात नाही. केवळ आम्ही दलित असल्याने दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्नही सचिन साठे यांनी उपस्थित केला. अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील काम पाहून अनेक लोकप्रतिनिधींनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून त्याबाबत काही प्रतिक्रिया आलेली नाही.

अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मातंग समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले. मात्र, हे महामंडळही गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. या समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप साठे यांनी केला. विविध मागण्या घेऊन लवकरच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची आपण भेट घेणार आहोत. याबाबत सरकारकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली नाही, तर राज्यभर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सचिन साठे यांनी दिला.

Last Updated : Jul 30, 2020, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.