ETV Bharat / state

शिराळ्याचा इतिहास संभाजीराजेपासून प्रसिद्ध ; भाजपला घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचाय

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणे झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Oct 14, 2019, 6:04 PM IST

Updated : Oct 14, 2019, 8:58 PM IST

सांगली - शिराळ्याचा इतिहास संभाजी महाराजांपासून प्रसिद्ध आहे. भाजपला महाराष्ट्रातून घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. ते शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे आयोजित सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण

कोल्हे पुढे म्हणाले, भाजपने नाशिकमधील कांद्यावर निर्यातबंदी आणली आणि पाकिस्तान मधून कांदा निर्यात केला. यासाठी आपण भाजपला निवडून दिले होते का? तर पारंपरिक पद्धतीची नागपंचमी पूर्ववत सुरू करू असे काहींनी सांगून शिराळकरांची मने दुखावली आहेत. यासाठी आता त्यांना पायउतार करून मानसिंगराव नाईक यांना निवडून द्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.

हेही वाचा - राजकारणातले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान

भाजप सरकारमुळेच पाच वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदी - जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लिहावा लावेल. भाजप सरकारमुळेच पाच वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे संकट आले आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते शिराळा विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे घेण्यात आलेल्या प्रचार दरम्यान बोलत होते.

हेही वाचा - VIDEO...जेव्हा प्रवीण पोटे फोटो काढण्यासाठी करतात आटापिटा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले, पुणतांब्याच्या घटनेनंतर काही शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली. मात्र, महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे सावट भाजपमुळेच पसरले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये युवकांना नोकऱ्या देतो म्हणून सांगितले होते. पण सध्या आर्थिक मंदी मुळे बरेच कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने लाखो कामगारांना घरात बसण्याची वेळ आली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला त्यांची जागा दाखून द्या, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

Intro:Body:.Conclusion:स्लग,, शिराळ्याचा इतिहास संभाजी महाराजांपासून प्रसिद्ध आहे भाजपाला महाराष्ट्रातून घालउन पुन्हा तोच इतिहास घडवायचा आहे.भाजप पक्षाने नाशिक मधील कांद्यावर निर्यातबंदी आणली आणि पाकिस्तान मधून कांदा निर्यात केला यासाठी का आपण भाजपाला निवडून दिले होते.तर शिराळ्यातील पारंपरिक पद्धतीची नागपंचमी पूर्ववत सुरु करू असे काहींनी सांगून शिराळकरांची मने दुखावली आहेत.यासाठी आता त्यांना पायउतार करून मानसींगराव नाईकयांना निवडून देण्याचे खाजदार अमोल कोल्हे यांनी शिराळा येते सांगितले.ते 284शिराळा विधानदसभा मतदार संघातील उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारा दरम्यान बोलत होते...
अँकर ,, देवेंद्र फडणवीस यांच्या 16हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यामुळे इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लिहावा लावेल.आता का त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. भाजप सरकारमुळेच पाच वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे संकट आले आहे. जयंत पाटी.
Vvio,, 40वर्ष शिवाजीराव देशमुख हे जातीवादी जनशक्ती च्या विरोधात लढत होते पण त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी भाजप मध्ये प्रवेश केला पण जो पर्यंत शिवाजीराव नाईक यांचा पराभव होत नाही तो पर्यंत सत्यजित देशमुख आमदार होणार नाही.हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा कारण त्यांच्या मनातील खदखद साडू पाहुणा म्हणून मलाच माहित आहे.कारण ते सध्या कमळाच्या गोठ्यात असल्याने त्यांना काही बोलता येत नाही.असा टोलाही जयंती पाटील यांनी लगावला. पुलतांब्याच्या घटनेनंतर काही शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली. तर महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे सावट भाजपमुळेच पसरले आहे.पाच वर्षांमध्ये युवकांना नोकऱ्या देतो म्हणून सांगितले होते पण सध्या आर्थिक मंदी मुळे बरेच कारखाने बंद पडण्याच्या मार्गांवर असल्याने लाखो कामगारांना घरात बसण्याची वेळ या फडणवीस सरकार मुळे आली आहे.यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाला त्यांची जागा दाखून द्या तर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करू महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे जयंत पाटील 284शिराळा विधानसभा मतदार संघांचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील शिराळा येथे घेण्यात आलेल्या प्रचार दरम्यान बोलत होते. यावेळी मानसींराव नाईक यांना मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी जाहीर पाठींबा दिला.तर जी. प. सदस्य संजीव पाटील रवींद्र बर्डे व इतर कार्यकर्त्यानि आपले मनोगत व्येक्त केली यावेळी वाळवा तालुक्यातील व शिराळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक हजर होती.
Last Updated : Oct 14, 2019, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.