ETV Bharat / state

इस्लामपूरचे अष्टपैलू व्यक्तीमत्व अॅड.सुधीर पिसे यांचे निधन - इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे यांचे निधन

इस्लामपूर येथील जेष्ठ समाजसेवक व विविध क्षेत्रासह राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राहिलेल्या अॅड. सुधीर पिसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 वर्षी त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला.

Adv. Sudhir Pise passes away
अॅड.सुधीर पिसे यांचे निधन
author img

By

Published : Dec 5, 2020, 12:20 PM IST

सांगली - इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. सुधीर सिताराम पिसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 वर्षी त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. नामदेव समाजोन्नती परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे उपाध्यक्ष, इस्लामपूरच्या राजकारणात गेली अनेक वर्ष ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले..

इस्लामपूर येथील जेष्ठ समाजसेवक व विविध क्षेत्रासह राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राहिलेल्या अॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

हेही वाचा - कोरोना लस मोफत द्या! बिहार निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ?

एक नजर पिसे यांच्या कारकिर्दवर

उद्योग, सामाजिक, क्रीडा आणि राजकारणात सुधीर पिसे यांनी आपल्या कर्तृत्ववाने वेगळा ठसा उमटवला .डिसेंबर १९९१ ते १ एप्रिल १९९३ या कालावधीत त्यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. यशस्वी उद्योजक राजकारणी व समाजासाठी जपणारे म्हणून त्यांची ओळख होती. संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी सलग २० वर्षे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष पद भुषविले. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रास भूषण वाटावे अशा अनेक सामाजिक कार्यात ते कायमच अग्रेसर राहिले. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर येथे नामदेव महाद्वार उभारणी, नामदेव शिंपी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश, नामदेव स्मारकासाठी १५ कोटी शासनाकडून मंजुरी मिळवून ६० कोटीचा आराखडा शासनास सादर केला आहे, अशी अनेक भरीव कामे त्यांच्या कारकिर्दीमध्ये पार पडली. तसेच अनेक समाजहिताची कामे पूर्णत्वाला गेली आहेत.

हेही वाचा - LIVE : ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

पिसे यांच्या निधानने मोठी हानी..

त्यांच्या निधनामुळे शिंपी समाजाचे नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार दिनांक 6 रोजी सकाळी नऊ वाजता उरून इस्लामपूर होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.