सांगली - मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल. त्यानंतर पश्चिम बंगालमधील ही सरकार ( Government In Maharashtra And West Bengal Will Be Dismissed ) बरखास्त होईल, असे भाकीत भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर ( Bjp Leader Suresh Halvankar ) यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपाचा कार्यकर्ता मेळावा - केंद्रातल्या भाजपा सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगलीत जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला सांगलीचे खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश गाडगीळ, मिरजचे आमदार सुरेश खाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
100 टक्के सरकार बरखास्त - यावेळी बोलताना हळवणकर म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांनी दिली आहे. राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल. त्यानंतर पश्चिम बंगालमधील ही सरकार बरखास्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही सरकार बरखास्त केले नाही. मात्र, आता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मधील सरकार शंभर टक्के बरखास्त करतील, असेही हळवणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Pankaja Munde : उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे समर्थक आक्रमक; केंद्रीय मंत्री कराडांच्या कार्यालयावर हल्ला