ETV Bharat / state

सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च करणार; अभिनेत्री दिपाली सय्यदची घोषणा

सांगलीचा महापूर ओसरला आहे. या महापुराच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रेटी सांगलीकडे मदतीसाठी धाव घेत आहेत. आज मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिने सांगली शहरातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शहरातील मारुती चौक, हरभट रोड, सांगलीवाडी या ठिकाणी पूरस्थितीची पाहणी केली. दिपालीने पूरग्रस्तांशी संवाद साधला.

सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च करणार; अभिनेत्री दिपाली सय्यदची घोषणा
author img

By

Published : Aug 17, 2019, 1:34 PM IST

सांगली - अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद हीने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात १ हजार मुलींचा विवाह लावून दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक मुलीच्या नावे ५० हजार रुपये जमा केले जाणार असल्याचे दिपालीने सांगितले. शनिवारी सांगलीतील पूरस्थिती पाहणी केल्यानंतर ती बोलत होती.

सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च करणार; अभिनेत्री दिपाली सय्यदची घोषणा

सांगलीचा महापूर ओसरला आहे. या महापुराच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रेटी सांगलीकडे मदतीसाठी धाव घेत आहेत. आज मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद- भोसले हिने सांगली शहरातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शहरातील मारुती चौक, हरभट रोड, सांगलीवाडी या ठिकाणी पूरस्थितीची पाहणी केली. दिपालीने पूरग्रस्तांशी संवाद साधला.

अनेक नागरिकांच्या घरांपर्यंत आजही धान्य आणि सरकारची मदत पोहोचली नाही. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मदत पोहोचली आहे, तर काही ठिकाणी मदत अद्यापही पोहोचली नाही. त्यामुळे सरकारने ही मदत प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत कशी पोहोचेल? याबाबत नियोजन केले पाहिजे, असे दिपाली म्हणाली.

व्होट बँक आणि राजकारणासाठी या परिस्थितीचा उपयोग होता कामा नये. पूरग्रस्तांना मदत कशी मिळेल? याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. या पूरस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मुलींच्या लग्नाचा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर निर्माण झाला आहे. मात्र, या सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार असल्याचे दिपालीने जाहीर केले आहे. तसेच प्रत्येक मुलीच्या नावे 50 हजार रुपये डिपॉझीट म्हणून जमा केले जाईल, असेही दिपालीने स्पष्ट केले. तसेच या पूरग्रस्त मुलींची आई म्हणून भूमिका निभावणार असल्याचे तिने सांगितले.

Intro:सरफराज सनदी

Feed send - file name - mh_sng_01_purgrast_girl_lagn_kharch_vis_01_7203751 -
mh_sng_01_purgrast_girl_lagn_kharch_byt_04_7203751

स्लग - सांगली-कोल्हापुरच्या पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च,अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसलेने उचलला...

अँकर - सांगली-कोल्हापूर मधील पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद हिने उचलला आहे.१ हजार मुलींचा सामूहिक पध्दतीने विवाह लावून, प्रत्येक मुलीच्या नावे 50 हजार रुपये जमा करणार असल्याचे अभिनेत्री अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद हिने जाहीर केले आहे.तसेच मतांचं राजकारण न करता प्रत्येक पूरग्रस्तां पर्यंत मदत पोहोचावी असे आव्हान दीपाली भोसले-सय्यद हिने केले आहे.सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या.Body:सांगलीचा महापूर ओसरला आहे,आणि या महापुराच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी सांगलीकडे मदतीसाठी धाव घेत आहेत. आज मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद- भोसले हिने सांगली शहरातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली.यावेळी शहरातल्या मारुती चौक,हरभट रोड सांगलीवाडी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करत ,दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांशी संवादही साधला आहे.यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद भोसले यांनी आज अनेक नागरिकांच्या घरांपर्यंत धान्य आणि सरकारची मदत पोहोचली नाही.काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मदत पोहोचली आहे,तर काही ठिकाणी मदत अद्यापि पोहोचली गेली नाही,त्यामुळे सरकारने ही मदत प्रत्येक पूरग्रस्तांच्या पर्यंत कशी पोहोचेल याबाबत नियोजन केले पाहिजे ,अशी मागणी करत , व्होट बँक आणि राजकारणासाठी या परिस्थितीचा उपयोग होता कामा नये, पूरग्रस्तांना मदत कशी मिळेल याचा सर्वांनी विचार केला पाहिजे असं आवाहन दीपाली सय्यद-भोसले यांनी यावेळी केला आहे.या पूर परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मुलींच्या लग्नाचा प्रश्न सध्या त्यांच्या पालकांच्या समोर निर्माण झालाय ,मात्र आपण या सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार असल्याचं जाहीर केले आहे. सामूहिक पद्धतीने एक हजार मुलींचा लग्न लावून देऊ,व प्रत्येक मुलीच्या नावे 50 हजार रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले जाईल ,असेही दीपाली सय्यद भोसले यांनी स्पष्ट करत या पूरग्रस्त मुलींची आई म्हणून ही भूमिका निभावणार असल्याचं अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले यांनीसांगितलं आहे.

बाईट :- दीपाली सय्यद-भोसले - अभिनेत्री .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.