ETV Bharat / state

Aadesh Bandekar : 97 वर्षीय आजींचे गाणे ऐकण्यासाठी 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर पोहचले थेट सांगलीत - होम मिनिस्टर

'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर हे एका 97 वर्षीय आजींना भेटण्यासाठी थेट सांगलीत पोहोचले. मात्र, या आजीबाई पक्षाचे कार्यकर्ते नाही तर त्या आदेश यांचे 'फॅन'आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जोशी आजी नियमितपणे आदेश बांदेकरांचा टीव्ही वरील शो पाहतात. इतकेच नव्हे तर आदेश बांदेकर स्क्रीनवर येताच हात जोडून त्यांना गाणे ऐकवतात.

आदेश बांदेकर
आदेश बांदेकर
author img

By

Published : Jun 1, 2022, 4:32 PM IST

सांगली - 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर हे एका 97 वर्षीय आजींना भेटण्यासाठी थेट सांगलीत पोहोचले. मात्र, या आजीबाई पक्षाचे कार्यकर्ते नाही तर त्या आदेश यांचे 'फॅन'आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जोशी आजी नियमितपणे आदेश बांदेकरांचा टीव्ही वरील शो पाहतात. इतकेच नव्हे तर आदेश बांदेकर स्क्रीनवर येताच हात जोडून त्यांना गाणे ऐकवतात.

आदेश बांदेकर यांनी घेतली आजींची भेट

97 वर्षीय फॅनला भेटले भाऊजी - नुकताच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील एका शिवसैनिक असणाऱ्या आजीबाईंना भेटायला गेले होते. त्याची चर्चा सगळीकडेच रंगली होती. आता अशाच एका आजीबाईंना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि अभिनेते असणारे "होम मिनिस्टर" मालिका फेम,आदेश बांदेकर थेट सांगलीला पोहोचले. सांगली शहरातील गावभाग येथे राहणाऱ्या नलिनी जोशी आजींची आदेश बांदेकर यांना सदिच्छा भेट घेतली आहे. पण या जोशी आजी ना तर शिवसेनेच्या कार्यकर्ते आहेत, ना कोणी व्हीआयपी व्यक्ती आहेत. 97 वर्षीय असणाऱ्या या आजीबाई या आदेश बांदेकर यांच्या 'फॅन'आहेत.

जोशी आजींचे गाणे ऐकून नतमस्तक - महाराष्ट्रभर आदेश बांदेकर यांचे अनेक फॅन आहेत. त्यापैकी जोशी आजी देखील, मात्र बांदेकरांनी भेट घ्यावी, असे आजींनी काय केले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ऐकून थोडेसे आश्चर्य वाटेल की, आजीबाई आदेश बांदेकर यांचा रोज टीव्हीवर येणारा होम मिनिस्टर शो आवर्जून पाहतात. तुम्ही म्हणाल त्यात नवल काय ? पण त्याहीपेक्षा आदेश बांदेकरांना जोशी आजी रोज टीव्हीसमोर गाणे ऐकवतात. स्क्रीनवर आदेश बांदेकर येताच आजी बिनचूकपणे टीव्ही समोर हजर असतात आणि हात जोडून आदेश बांदेकरांना नमस्कार करुन गीत ऐकवतात. आजींच्या नातेवाईकांना आदेश बांदेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष गाणे झाले पाहिजे. बांदेकर यांनी गाणे ऐकले पहिजे,अशी इच्छा होती. त्यांची ही गोष्ट अभिनेते आदेश बांदेकर यांच्यापर्यंतही पोहोचली. मग आदेश बांदेकर यांनी जोशी आजींना भेटण्यास उत्सुकता दर्शवली. जोशी आजींना भेटण्यासाठी बांदेकर शुक्रवारी (दि. 27 मे) थेट सांगलीमध्ये दाखल झाले.

गाण्याची सीडी आणि पैठणी दिली भेट - यावेळी जोशी आजीबाईंची आदेश बांदेकर यांनी आवर्जून विचारपूस केली.आदेश बांदेकर यांना पाहून 97 वर्षीय आजींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर जोशी आजींनी नित्यनियमाप्रमाणे ऐकवली जाणारी गाणी, प्रत्यक्षरीत्या आदेश बांदेकर यांच्या समोर सादर केल्या.
यावेळी आदेश बांदेकर यांनी देखील तल्लीन होऊन आजींच्या गाण्यांचा आनंद घेतला. यावेळी आदेश बांदेकर यांनी आजींच्या गायनाची आवड पाहून, जोशी आजींना 5 हजार गाण्यांचा संग्रह असणारी सीडी भेट देत पैठणी देऊन, सत्कार केला. तसेच आदेश बांदेकर यांच्या भेटीच्या निमित्ताने जोशी आजींची आंब्याची तुला करण्यात आली.

हेही वाचा - समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा - उपमुख्यमंत्री अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.