ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सांगलीतील मिरजमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केला होता. पीडित मुलीवर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपी अरुण कोळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा.
author img

By

Published : Aug 19, 2019, 11:48 PM IST

सांगली - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण कोळी असे आरोपीचे नाव असून सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीवर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सांगलीच्या मिरजमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलीला तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी अरुण कोळी याने जबरदस्तीने गाडीवर बसवून मिरजेनजीकच्या ढवळी येथे एका शेतात नेऊन बलात्कार केला होता. यानंतर दोन दिवसांनी बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता.

याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी अरुण कोळी याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आज खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. ज्यात सरकारपक्षातर्फे 6 साक्षीदारांकडून साक्ष नोंदवण्यात आल्या. यामध्ये आरोपी अरुण कोळीला दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

Intro:File name - mh_sng_06_janmthep_vis_1_7203751 - mh_sng_06_janmthep_byt_3_7203751

स्लग - अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तरुणास जन्मठेपेची शिक्षा...

अँकर - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अरुण कोळी या तरुणाला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.पीडित मुलीला कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन हा बलात्कार करण्यात आला होता,मिरजे मध्ये हा प्रकार घडला होता.Body:सांगलीच्या मिरजमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आरोपी अरुण कोळी या तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलीला तिच्या कुटुंबास जीवित जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी अरुण कोळी याने जबरदस्तीने गाडीवर बसवून मिरजे नजीकच्या ढवळी येथे एका शेतामध्ये नेऊन बलात्कार केला होता.यानंतर दोन दिवसानंतर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता.याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी अरुण कोळी याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी आज खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली.ज्या मध्ये सरकारी पक्षा तर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले,आणि यामध्ये आरोपी अरुण कोळी याला दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आले. सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिलं.

बाईट - अरविंद देशमुख - सरकारी वकील,सांगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.