ETV Bharat / state

इस्लामपुरात पोलिसांनी ठोकल्या चोरास बेड्या,  प्रेयसीसाठी करत होता  घरफोडी - Sangli crime news

सांगली पोलिसांना घरफोड्या करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सांगली पोलीस करत आहेत.

accused-of-robbery-was-arrested-from-islampur
इस्लामपूर येथील आशिक चोराने केली प्रेयसीसाठी घरफोडी
author img

By

Published : Feb 26, 2020, 9:23 PM IST

सांगली - प्रेमात आणि युध्दात सर्व माफ असते, अशी एक म्हण आहे. असाच प्रकार इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्रेयसीच्या प्रेमाखातर घरफोड्या करणाऱ्या कुणाल संजय शिर्के (वय.२४ रा.भवानीनगर ता. वाळवा) या प्रेमवीराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी अलमगीर लतीप आणि किरण मस्के या हेड कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात यश आले.

इस्लामपूर येथील आशिक चोराने केली प्रेयसीसाठी घरफोडी

याबाबत रात्री २.३०च्या सुमारास गस्त पथकाची गाडी कोल्हापूर नाक्यावर थांबली होती. या वेळेत वाघवाडीकडून एक मोटरसायकलस्वार भरधाव वेगाने आष्ट्याच्या दिशेने चालला होता. त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. त्याने न जुमानता गाडी वेगाने चालवली. दरम्यान या पथकातील अलमगीर लतीप आणि किरण मस्के या पोलिस कॉन्स्टेबलनी दुचाकी वरून त्याचा पाठलाग सुरू केला. पाठीमागून पोलिस येत आहेत. याचा अंदाज आल्याने कुणालने स्टेट बँकेच्या परिसराकडे गाडी वळवली. इतक्यात पोलिसांनी त्याला अडवले व ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता. इस्लामपूर शहरात सात ठिकाणी तर सलगरे आणि कवठेमहांकाळ या परिसरातही घरफोडया केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. त्या संशयीताला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता दि. २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईसाठी पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सह पोलीस निरीक्षक. ज्ञानेश्वर वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक ठोंबरे, शरद जाधव, गजानन जाधव, अमोल चव्हाण, अरूण पाटील, श्रीकांत अभंगे, अरूण पाटील, किरण मस्के, सुरज जगदाळे, योगेश जाधव, गणेश शेळके, जयराम चव्हाण यांचा या कारवाईत समावेश आहे.

अज्ञात चोरट्यांना पकडून घरफोडीचे गुन्हे उघकीस आणण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार इस्लामपूर, शिराळा हद्दीतील २० ते २२ घरफोडयातील आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. ही मोहिम अधिक प्रभावी राबवणार असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.