सांगली - काळजाचा थरकाप उडवणार अपघात जत तालुक्यात झाला आहे. विजापूर-गुहागर या राष्ट्रीय मार्गावरील ( Vijapur Guhagar Accident ) धावडवाडी येथे एका 2 वर्षाच्या मुलाला 6 किलोमीटर फरफटत नेल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये अब्दुल समद साजिद शेख हा चिमुरडा ठार ( 2 Year Old Boy Death In Accident ) झाला आहे. तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्यामध्ये हा अपघात झाला आहे.
6 किलोमीटर चिमुरड्याला नेले फरफटत -
जत तालुक्यातील धावडवाडी येथे एका इंडिका कारने मोटरसायकलस्वर पती-पत्नी व लहान मुलासह फरपटत नेल्याचा हा प्रकार आहे. यामध्ये दोन वर्षाच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल समद साजिद शेख, असे या चिमुरड्याचे नाव आहे. विजापूर-गुहागर या राष्ट्रीय मार्गावर साजिद लालखान शेख व यांच्या पत्नी जबिन साजिद शेख आपल्या मुलास धावडवाडी येथून दुपारच्या सुमारास मोटर सायकलने निघाले असता मागून येणाऱ्या एम.एच. 12 एच एन 1674 इंडिका विस्टा कारने जांभूळवाडी फाट्याजवळ जोराची धडक दिली. ज्यामध्ये साजिद शेख हे जोराने उडून बाजूला बेशुद्धावस्थेत पडले, तर पत्नी व मुलगा गाडीच्या बंम्परमध्ये अडकून फरफटत 300 मीटर पर्यंत गेले. त्यानंतर जबिन शेख या सुद्धा रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. मात्र, लहान बाळ अब्दुल समद हा गाडीच्या बंपरमध्ये अडकून राहिला आणि निर्दयी चालकाने तशीच भरधाव वेगाने गाडी पळवली, ज्यामध्ये अब्दुल समद हा अडकून फरफटत होता.
निर्दयी चालकाला नागरिकांना दिला चोप -
महामार्गावर पुढे असणाऱ्या चोरीची येथे काही नागरिकांनी, भरधाव जाणाऱ्या गाडी चालकास आवाज दिला. पण त्याने गाडी न थांबवता आणखी वेगाने गाडी पुढे निघाले. चोरोची येथील काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून ती गाडी अडवली. तोपर्यंत गाडीवाल्याने लहान मुल बाजूला काढून टाकले होते. हे पाहताच संतप्त नागरिकांना चालकाला बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील त्या लहान बालकाचे नातेवाईक पोहोचले. त्या बालकाला घेऊन ढालगाव येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्या आधीच मुलाचा मृत्यू झाला होता. तर जखमी साजिदलाल खान शेख व जमीन साजिद शेख या दोन्ही पती-पत्नींना जत येथे खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - Onion Market price in Lasalgaon : लासलगाव बाजारात कांद्याचा भाव घसरला; शेतकरी हतबल