सांगली - पूर्व आफ्रिकेतून आलेला एका व्यक्तीचा सांगलीच्या मिरजेत मृत्यू झाला आहे. मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, त्या रुग्णांचा ओमायक्रॉन ( Omicron Variant ) चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याने भीती व्यक्त केली जात आहे. पण, जिल्हा प्रशासनकडून त्या व्यक्तीचा निमोनियामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आफ्रिका टू सांगली ...
मात्र, खबरदारी म्हणून मृत व्यक्तीच्या घरातील 5 आणि संपर्कातील 20 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्या व्यक्तीने पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून केनिया-दोहा-मुंबई, असा प्रवास करत जत या ठिकाणी आला होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने एका खासगी रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांनंतर प्रकृती अतिगंभीर बनल्याने त्या व्यक्तीला बुधवारी (दि. 8 ) मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी शासकीय रुग्णालयात त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.
कोरोना टेस्ट निगेटिव्ह, ओमायक्रॉनची भीती ...
मात्र, खबरदारी परदेशातून आल्याने खबरदारी म्हणून त्या व्यक्तीच्या स्वॅबचे नमुने ओमायक्रॉन चाचणी करण्यासाठी पुणे याठिकाणी पाठवण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. 9) रात्रीच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यूबाबत जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी निमोनिया हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे.
मात्र, खबरदारी म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील आणि त्याच्या संपर्कात आलेल्या, अशा पंचवीस जणांचे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत. योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. पण, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
हे ही वाचा - किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली दहा लाखांचा गंडा