ETV Bharat / state

सोन्या-हरण्याची बातच न्यारी; मोबाईलच्या रिंगटोनवर थांबणारी बैलजोडी! - सावर्डे बैलजोडी वाहतुक नियम पालन न्यूज

मानव हा सर्वात हुशार प्राणी समजला जातो. मात्र, कधी-कधी ज्या गोष्टी मानवाला समजत नाहीत त्या मुक्या प्राण्यांना समजतात. याची काही उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. सांगलीच्या सावर्डे गावात अशीच एक बैलजोडी आहे, जी चक्क वाहतुकीचे नियम पाळताना दिसते.

Bullock Cart
बैलगाडी
author img

By

Published : Dec 10, 2020, 12:10 PM IST

सांगली - 'माणसा परिस जनावरं शहाणी' बऱ्याच वेळा हा वाक्प्रचार आपल्या कानी पडतो. सांगलीच्या सावर्डेगावातील नागरिक या वाक्प्रचाराचे जिवंत उदाहरण दररोज पाहतात. या गावातील सोन्या आणि हरण्या नावाची बैलजोडी गाडी चालवताना मोबाईलवर न बोलण्याचा वाहतुकीचा नियम त्यांच्या मालकाला पाळायला भाग पाडतात. बैलगाडी चालत असताना जर मालकाच्या मोबाईलची रिंगटोन वाजली तर सोन्या-हरण्या जागच्या जागी थांबतात. मालकाचे मोबाईलवरील संभाषण आवरले की पुन्हा मार्गाला लागतात.

उमेश जाधव यांची बैल जोडी

बैलजोडी पाळते वाहतुकीचे नियम..!

दुचाकी किंवा इतर वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. मात्र, तरीह अनेक जण वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळत नाहीत. अशा दीडशहाण्या माणसांसाठी तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील सोन्या आणि हरण्या बैलजोडीने एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. आता तुम्ही म्हणाल बैलांचा आणि मोबाईलचा काय संबंध? सावर्डे गावातील शेतकरी उमेश जाधव यांच्याकडे दोन बैल आहेत. यापैकी एकाचे नाव सोन्या आणि दुसऱ्याचे नाव हरण्या आहे. अत्यंत देखणी आणि धष्टपुष्ठ अशी ही सोन्या- हरण्याची जोडी आहे. या सोन्या-हरण्याला त्याच्या मालकाच्या मोबाईल रिंगटोनची सवय लागली आहे. शेतात काम करताना किंवा रस्त्यावरून जाताना मालकाच्या मोबाईलची रिंगटोन वाजली की सोन्या-हरण्या हे जागच्या जागी थांबतात. मालकाचे मोबाईलवरील संभाषण पूर्ण झाल्यावर पुन्हा मार्गस्थ होतात. माणसांना वाहतुकीचे नियम समजत नाहीत पण या जनावरांना समजतात, याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.

मालकांनी केला सोन्या-हरण्याचा उत्तम सांभाळ -

सोन्या-हरण्याचे मालक असणारे शेतकरी उमेश जाधव सांगतात, त्यांच्या घरातील गाईला झालेली हे दोन्ही बैल आहेत. उमेश यांना लहानपणापासून बैल खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी लहानपणापासून सोन्या-हरण्याचे अतिशय लाडात पालन पोषण केले. त्यांना दररोज प्रत्येकी 5 लिटर प्रमाणे दूध आणि अंडी असा खुराक दिला जातो. उमेश यांच्या पत्नीचेही या बैलजोडीवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम आहे.

लहान मुलांप्रमाणे लावली सोन्या-हरण्याला शिस्त -

सोन्या-हरण्या लहान असताना त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा उमेश यांनी प्रयत्न केला. त्यांना फोन आला की, ते बैलगाडी थांबवून बोलत असत. ही गोष्ट सोन्या-हरण्यालाही सवयीची झाली. कालांतराने असे झाले की, उमेश यांच्या मोबाईलची रिंग वाजली की, दोन्ही बैल आपोअप थांबू लागले. याशिवाय सोन्या-हरण्याला अनेक बाबींची शिस्त उमेश यांनी लावली आहे.

कधी-कधी करावा लागतो मोबाईल सायलेंट -

उमेश बैलजोडी घेऊन इतरांच्या शेतातही पेरणीसाठी जातात. पेरणीवेळी उमेश यांना फोन आला की सोन्या-हरण्या पेरणीचे कामच थांबवतात. त्यामुळे कधी-कधी मोबाईलच सायलेंट करावा लागलो. कारण बैलांना रिंगटोनची सवय लागली आहे. आता पंचक्रोशीत सोन्या-हरण्याची सवय चर्चेचा विषय झाली आहे. आता तर उमेश यांना कॉल केल्यानंतर लोक अगोदर विचारतात बैलजोडी बरोबर आहे का? असे उमेश जाधव सोन्या-हरण्याच्या बाबतीत सांगतात.

पंचक्रोशीतही सोन्या-हरण्याची चर्चा -

तासगाव तालुक्यात सोन्या-हरण्याची मोबाईल रिंगटोनवर थांबण्याची चर्चा पसरली आहे. अनेक जण याबाबत आश्चर्य व्यक्त करतात. याबाबत उमेश जाधव यांच्या गावात राहणारा सुशांत इरळे हा तरुण सांगतो, खरं तर दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलू नये, फोन आल्यास थांबून बोलले पाहिजे, असे नियम सांगतात. तरीही नागरिक ऐकत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात घडतात. मात्र, जे माणसाला समजत नाही, ते मुक्या जनावराला कळते, हे सोन्या-हरण्याच्या जोडीला पाहून समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.