सांगली - दोन मुलांसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे ही घटना घडली आहे. चंदा सदाकाळे(वय 30), शंभू दादासो सदाकळे (वय 7) आणि हिंदुराज दादासो सदाकळे (वय 9), अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - धक्कादायक...पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या, 7 वर्षीय चिमुकली झाली अनाथ
दोन दिवसांपासून मुलांसह विवाहित महिला घरातून बेपत्ता होती. काल(16 जानेवारी) सकाळी घरा शेजारी असणाऱ्या विहिरीत या सर्वांचे मृतदेह आढळून आले. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेचा माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची शक्यता तासगाव पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. सावर्डे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.