सांगली- जिल्ह्यात शनिवारी आणखी ७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८६ वर पोहोचला आहे. शनिवारी ६ जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण १७२ जणांना डिस्चार्च देण्यात आला आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. शनिवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी शिराळा तालुक्यातील मणदूर येथील-१ ,कडेगावच्या नेर्ली येथील १ आणि रायगाव येथील -१ , तासगाव तालुक्यातील वायफळे येथील १, मिरज तालुक्यातील डिग्रज येथील २, बामणोली येथील १ असे एकूण ७ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.
शनिवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर व किनरेवाडी येथील २ जण, वाळवा तालुक्यातील वाटेगाव व ठाणापुडे येथील २ जण, तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील १ आणि कडेगावच्या विहापुर येथील १ अशा ६ जणांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात शनिवारी 7 नव्या रुग्णांची वाढ... एकूण आकडा पोहोचला 286 वर - कोरोना व्हायरस सांगली बातमी