सांगली - कुपवाड पोलिसांनी एका गोडाऊनर छापा टाकत पोलिसांनी 33 लाख रूपयांची सुगंधी तंबाखू जप्त केली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सरफराज रजाक कच्ची, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यात अवैध व्यावसायिकावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल्ल यांनी दिलेल्या आदेशानुसार कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - परतीच्या पावसाने शेतकरी उद्विग्न; दीड एकरातील द्राक्षे फेकली ओढ्यात
सहाय्यक पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना गोपनीय माहिती मिळाली, की सावळी काननवाडी रस्त्यालगत सरफराज कच्ची याने सुगंधी तंबाखूचा साठा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी काननवाडी रस्त्यालगत छापा टाकला. यावेळी कच्ची याच्या गोडाऊनमधून सुगंधी तंबाखूचे 75 बॉक्स जप्त करण्यात आले. या तंबाखूची अंदाजे ३३ लाख एवढी किंमत आहे. पोलिसांनी तत्काळ अन्न औषध प्रशासनाला कळवून सदरचा माल जप्त केला आहे.
हेही वाचा - सांगलीत भरदिवसा दरोडा; चार लाखाचा मुद्देमालासह चोरटे पसार