ETV Bharat / state

घटत्या रुग्णसंख्येमुळे सांगली जिल्ह्यातील 33 कोविड सेंटर बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - सांगली कोरोना बातमी

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे कोरोना रुग्णालयातील बेड रिकामे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील 33 डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आली आहेत.

कोविड सेंटर
कोविड सेंटर
author img

By

Published : Jun 21, 2021, 9:17 PM IST

सांगली - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे कोरोना रुग्णालयातील बेड रिकामे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील 33 डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

रुग्णांअभावी 33 कोविड सेंटर बंद

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागलेला आहे. कोरोना रुग्ण संख्याही दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर रुग्णांच्या अभावी रिकामे पडत असल्याचे चित्र निर्माण झाला आहे. अत्यंत कमी रुग्ण संख्या असणारे कोविड रुग्णालय आणि कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी घेतला आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सहा ग्रामीण भागातील 33 कोरोना रुग्णालय आणि केअर सेंटर आता बंद करण्यात आली आहेत.

तिसरी लाट आल्यास पुन्हा सुरू

कोविड रूग्ण सद्यस्थिती पाहता व संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास बंद करण्यात आलेली रूग्णालये पुन:श्च कोविड रूग्णालये म्हणून कार्यान्वीत करण्यात येतील, या अटीस अधिन राहून या 33 रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

शासकीय साधन सामुग्री परत करा

या रूग्णालयात नविन रूग्ण दाखल करून घेवू नयेत व सद्यस्थितीत रूग्णालयात दाखल रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रूग्णालयातील फॅसिलीटी ॲपवरील सर्व माहिती अद्ययावत करावी, प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत. विहीत पध्दतीने रूग्णालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींची पुर्तता करूनच रूग्णालयातील कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही कोविड सेंटर झाली बंद

कोविड रूग्णसेवा बंद करण्यात आलेली सेंटर पुढीलप्रमाणे

(1) उमा चॅरिटेबल हॉस्पिटल जत, (2) कोविड-19 हॉस्पीटल तासगाव, (3) सदगुरू हॉस्पीटल,विटा, (4) स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,शिराळा, (5) श्रीनाथ डीसीएससी, आटपाडी,(6)नुतन डीसीएचसी,कवठेमहांकाळ (7) स्पंदन डीसीएचसी,कडेगाव (8) मनमंदिर डीसीएचसी, विटा (9) जिवनधारा हॉस्पीटल, विटा (10) मातोश्री डीसीएचसी,खानापूर (11) श्रीछत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी, आळसंद-खानापूर (12) वेध हॉस्पीटल डीसीएचसी, तासगाव(13) पार्वती डीसीएचसी, तासगाव (14) सदिच्छा कोविड डीसीएचसी, आष्टा (15) ख्वाजा गरीब नवाज डीसीएचसी, इस्लामपूर (16) मातोश्री डीसीएचसी, कासेगांव ता. वाळवा (17) सहारा कोविड हॉस्पीटल, इस्लामपूर (18) शिवगंगा डीसीएचसी पाटगांव ता. मिरज (19) डॉ. रविंद्र वाळवेकर हॉस्पीटल, सांगली (20) डॉ.महेश दुधणकर हॉस्पीटल,सांगली (21) संजिवनी मल्टीकेअर हॉस्पीटल एलएलपी,कुपवाड (22) डॉ.शरद घाटगे, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,सांगली (23) सायना क्लिनिक ॲण्ड हेल्थ सेंटर, सांगली (24) डॉ. दिपक शिखरे, लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,सांगली (25) डॉ. विठ्ठल माळी, नोबल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर,मिरज (26) डॉ. अनिल मडके, श्वास हॉस्पीटल,सांगली (27) भगवान महाविर कोविड केअर सेंटर,सांगली (28) डॉ. कपिल उपाध्ये, त्रिशला हॉस्पीटल सांगली (29) डॉ.सुरेश पाटील, हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,मिरज (30) डॉ. तुषार पिड्डे, शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पीटल, मिरज (31) न्यु लाईफ कोविड केअर सेंटर,सांगली (32) नमराह कोविड सेंटर, सांगली (33) डॉ.बसंत बुर्ले, संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली, यांचा समावेश आहे.

हेही वाचा - 'महापालिकेच्या रुग्णालयातील कोरोना मृतांची चौकशी करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.