ETV Bharat / state

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार शरद पवारांच्या पाठीशी - आमदार सुमनताई पाटील

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत भाजपसोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मागे कोणते आमदार असतील याबाबतीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान 3 आमदार आहेत, यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:29 PM IST

सांगली - महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या नाट्यमयघडामोडी पाहता, आमदार फुटीचे मोठे संकट राष्ट्रवादी समोर आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार आहेत. यामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांचा समावेश आहे आणि जिल्ह्यातील तीनही आमदार शरद पवार यांच्या मागे ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेश जोशी यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत भाजपसोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मागे कोणते आमदार असतील याबाबतीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान 3 आमदार आहेत, यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश आहे.

आमदार जयवंत पाटील -

इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील हे सलग 7 वेळा निवडून आले आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे निष्ठावान मानले जातात. राष्ट्रवादीच्या सत्तेत पाटील यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जवाबदारी शरद पवार यांनी सोपवली होती. तसेच गेल्या 5 वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागलेल्या पक्षाची होत असलेली घसरण पाहता, शरद पवारांनी जयंतराव पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.आणि जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाला नवी दिशा देण्याचे काम केले. तर सध्याची राजकीय परिस्थितीत अजित पवारांनी पक्षाची सोडलेली साथ पाहता, शरद पवारांनी अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदाची धुरा अत्यंत विश्वासूपणे सोपवली आहे.

आमदार सुमनताई पाटील -

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदर सुमन पाटील या राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांच्या सोबत आहेत. शरद पवार आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे अत्यंत जवळचे संबंध राहिले आहेत. शरद पावर यांचे मानसपुत्र म्हणून राज्याच्या राजकारणात आर. आर. पाटलांची म्हणजेच आबांची ओळख राहिलेली. दरम्यान, हा वारसा त्यांचा पत्नी सुमन पाटील या जपण्याचे काम करीत आहेत. सध्याच्या राजकीय परस्थितीत सुमन पाटील या शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे आहेत.

आमदार मानसिंगराव नाईक -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मानसिंगराव नाईक आणि शरद पवार यांचे जुने संबंध असून नाईक हे पवारांच्या बरोबर जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे नाईक हे जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

सोबतच सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपण शरद पवार यांच्याच पाठीशी ठाम राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

Intro:File name - mh_sng_04_ncp_mla_ready_to_air_7203751

स्लग - जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार शरद पवारांच्या पाठीशी...

अँकर - महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या नाट्यमयघडामोडी पाहता,आमदार फुटीचे मोठं संकट राष्ट्रवादी समोर आहे.सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार आहेत,यामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांचा समावेश आहे,आणि जिल्ह्यातील तीनही आमदार शरद पवार यांच्या मागे ठाम असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.Body:महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाऊन शपथ घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे,या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मागे कोणते आमदार असतील याच्या बाबतीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान 3 आमदार आहेत,त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील,आमदार सुमनताई पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश आहे.

यामधील इस्लामपूर मतदार संघातून जयंतराव पाटील हे सलग 7 वेळा निवडून आहेत.जयंतराव पाटील हे शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जातात,राष्ट्रवादीच्या सत्तेत पाटील यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जवाबदारी शरद पवार यांनी सोपवली होती.तसेच गेल्या 5 वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागलेल्या पक्षाची, होत असलेली घसरण पाहता,शरद पवारांनी जयंतराव पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.आणि जयंतराव पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाला नवी दिशा देण्याचे काम केले.तर सध्याची राजकीय परिस्थितीत अजित पवारांनी पक्षाची सोडलेली साथ पाहता,शरद पवारांनी अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदाची धुरा अत्यंत विश्वासूपणे सोपवली आहे.

तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदर सुमनताई पाटील या राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार सोबत आहेत.शरद पवार आणि माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे अत्यंत जवळचे संबंध राहिले.शरद पावर यांचे मानसपुत्र म्हणून राज्याच्या राजकारणात आर आर आबांची ओळख राहिली.आणि हा वारसा त्यांचा पत्नी सुमनताई पाटील या जपण्याचे काम करत आहेत.व सध्याच्या राजकीय परस्थितीत सुमनताई पाटील या शरद पवार यांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक हे शिराळा मतदार संघातून निवडून आले आहेत.मानसिंगराव नाईक आणि शरद पवार यांचे जुने संबंध असुन नाईक हे पवारांच्या बरोबर जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.त्यामुळे नाईक हे जयंतराव पाटील आणि शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

त्याचा बरोबर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण शरद पवार यांच्याच पाठीशी ठाम राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

बाईट - गणेश जोशी - जेष्ठ पत्रकार,
सांगली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.