ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे 2800 कोटींची मागणी - कृषिमंत्री अनिल बोंडे - कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुमारे 2 लाख 9 हजार 294 हेक्टर शेतीला महापुराचा फटका बसल्याची माहिती मंत्री बोंडे यांनी यावेळी दिली आहे. तर प्रशासनाकडून या सर्व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही बोंडे यांनी यावेळी दिली.

कृषीमंत्री अनिल बोंडे
author img

By

Published : Aug 19, 2019, 11:56 PM IST

सांगली - महापुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या तीन जिल्ह्यात मिळून अंदाजे 2800 कोटींचे नुकसान झाले आहे. यासाठी केंद्राकडे 2800 कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली. तसेच राज्यात अनेक ठिकाणी महापूर आणि दुष्काळ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा पिकांचे उत्पन्न कमी होणार असल्याची माहितीही कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिली. कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी सांगलीमध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्राकडे 2800 कोटींची मागणी - कृषिमंत्री अनिल बोंडे

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी जिल्ह्यातील पूर बाधित शेतीची अनिल बोंडे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानीचा आढावाही बोंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री बोंडे यांनी सांगली कोल्हापूर आणि सातारा विभागांमध्ये शेतीसह सर्वच परिस्थिती अत्यंत विदारक आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने ऊस शेतीला महापुराचा मोठा फटका बसला आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुमारे 2 लाख 9 हजार 294 हेक्टर शेतीला महापुराचा फटका बसल्याची माहिती मंत्री बोंडे यांनी यावेळी दिली आहे. तर प्रशासनाकडून या सर्व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही बोंडे यांनी यावेळी दिली. या तिन्ही जिल्ह्यात मिळून शेतीचे अंदाजे 2800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देत, या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करत आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे 2800 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र आणि राज्य आपत्ती निवारण यांच्या निकषांच्या पुढे जाऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. पिक विम्याच्या बाबतीतही कंपन्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत सूचना सरकारकडून देण्यात आल्याचे यावेळी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले.

Intro:File name name - mh_sng_05_sheti_nuksan_on_krushi_mantri_vis_01_7203751-to -mh_sng_05_sheti_nuksan_on_krushi_mantri_byt_03_7203751

स्लग - महापुराने सांगली ,कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात 2800 कोटींचे शेतीचे नुकसान, केंद्राकडे 2800 कोटींची मागणी - कृषिमंत्री अनिल बोंडे.

अँकर - महापुराने सांगली ,कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतीचे अंदाजित 2800 कोटींचे नुकसान झाले असून शेतीसाठी केंद्राकडे 2800 कोटींचा मागणी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे,तसेच महापुर आणि दुष्काळी अशी राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे, त्यामुळे यावेळी पिकांचे उत्पन्न कमी होणार असल्याची माहितीही कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.आज सांगलीमध्ये हे पूर परिस्थितीचा मंत्री बोंडे यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.Body:सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज जिल्ह्यातल्या पूर बाधित शेतीची अनिल बोंडे यांनी पाहणी केली आहे.तसेच नूकसानाची आढावाही राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून घेतला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री बोंडे यांनी सांगली कोल्हापूर आणि सातारा कोल्हापूर विभागांमध्ये शेतीसह सर्वच परिस्थिती अत्यंत विदारक आहे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रमुख्याने ऊस शेतीला महापुराचा मोठा फटका बसलाय कोल्हापूर ,सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुमारे 2 लाख 9 हजार 294 हेक्टर शेतीला महापुराचा फटका बसल्याची माहिती ती मंत्री बोंडे यांनी यावेळी दिली आहे.तर प्रशासनाकडून या सर्व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही बोंडे यांनी यावेळी दिली आहे. या तिन्ही जिल्ह्यात मिळून शेतीचे अंदाजे 2800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मंत्री बोंडे यांनी देत, या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी सरकार सर्वोतपरी मदत करत आहे,त्याचबरोबर या शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे 2800 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र आणि राज्य आपत्ती निवारण यांच्या निकषांच्या पुढे जाऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. पिक विमाच्या बाबतीतही कंपन्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत सूचना सरकारकडून देण्यात आल्याचे यावेळी मंत्री बोंडे यांनी यावेळी सांगितले आहे.

बाईट - अनिल बोंडे - कृषि मंत्री .

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.