ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात 25 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा आकडा 247 वर

सांगली जिल्ह्यात 25 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून रुग्णसंख्या 247 वर पोहोचली आहे. यापैकी 125 जण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यात 114 जणांवर उपचार सुरु आहेत.

file photo
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 15, 2020, 8:11 AM IST

सांगली - जिल्ह्यात रविवारी (दि. 14 जून) दिवसभरात तब्बल 25 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. तर 8 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 114 झााले आहे, तर आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 247 झाली आहे. यापैकी 125 जण हे कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शिराळा तालुका हा हॉटस्पॉट बनला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दिवसभरात तब्बल 25 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या एकट्या शिराळा तालुक्यात आतापर्यंत नोंदवली गेली आहे. तर रविवारी दिवसभरात 8 कोरोना रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

रविवारी दुपारपर्यंत वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर रात्री आणखी 5 जणांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेले हे सर्व जण आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 10 जण तर किनरेवाडी येथील 1 जण, असे 11 व्यक्ती आहेत. वाळवा तालुक्यातील येलूर, वाटेगाव, इस्लामपूर आणि फाळकेवाडी येथील प्रत्येकी 1 असे चार व्यक्ती, तासगाव तालुक्यातील गव्हाण व मांजर्डे येथील 2 जण, पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 2 जण, खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील 2 , जत तालुक्यातील अंकले येथील 2 मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 1 आणि कवठेमहांकाळ मधील 1 असे 25 जणांना कोरोना लागण झाली आहे. यासर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून संबंधित रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला आहे.

तर रविवारी दुपारपर्यंत उपचार घेत असलेले 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील रिळे माळेवाडी,काळोखेवाडी मणदूर येथील 4 जण, तासगाव मधील 1 आणि आटपाडीच्या शेटफळे मधील 1, खानापूरच्या साळशिंग आणि कवठेमहांकाळच्या कदमवाडी प्रत्येकी 1, असे 8 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे.

तर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या ही शिराळा तालुक्यात आतापर्यंत आढळून आलेली आहे. सध्या शिराळा तालुक्यातील 77 कोरोना रुग्ण असून त्यापैकी एकट्या मणदूर गावातील 47 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिराळा तालुका आणि तालुक्यातील मणदूर गाव हे हॉटस्पॉट बनले आहे.

रविवारी दिवसभरात 25 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि 8 जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 247 झाली आहे. तर सध्या एॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 1145 असून आतापर्यंत 125 कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा - वाळवा तालुक्यातील चंदवाडी येथील पन्नास वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.