ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात आढळले नवे 9 कोरोना रुग्ण ; तर 2 महिलांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. मिरजेतील दोन महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत.

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 13, 2020, 8:30 AM IST

सांगली - रविवारी कोरोनामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 19 वर पोहचला आहे. तर दिवसभरात 9 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 13 जण कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. मिरजेतील दोन महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. मिरज शहरातील माने प्लॉट येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचा तसेच सुंदर नगर येथील 78 वर्षाची वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दोघींवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते.

रविवारी दिवसभरात आणखी नव्या 9 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील सोनी येथील 1, बुधगाव येथील 1, कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे येथील 4 ,पलूस येथील 1 , सांगली शहरातील शिंदेमळा येथील 1, बुरुड गल्ली येथील 1 , असे 9 जणांचा समावेश आहे. तर रविवारी दिवसभरात 13 जण हे कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 304 झाली आहे. तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 641 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी आतापर्यंत 318 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 19 जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.