ETV Bharat / state

इस्लामपूरच्या सईने साजरा केला 'अशा' पद्धतीने आपला 'लॉकडाऊन वाढदिवस' - 14 years old girl celebrate her birthday with provide meals

इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हॉटेल पंगतमध्ये शिवभोजन थाळी मिळत आहे. येथे दररोज गरजू नागरिक शिवभोजन थाळीचे पार्सल घेण्यासाठी येत असतात. यात अनेक जण अत्यंत गरीब आहेत. त्यांच्याकडे जेवण घेण्यासाठी अवघे पाच रुपयेही नसतात. ही गरज ओळखत सईने वाढदिवसाचे निमित्त साधत 400 जणांच्या थाळीचे पैसे जमा करून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून तो गरजूंसाठी करावा, तिला असे वाटत होते.

सई मोहिते
सई मोहिते
author img

By

Published : Apr 12, 2020, 4:18 PM IST

सांगली - वाढदिवस म्हटले की नविन कपडे, केक आप्तेष्ठांसाठी चविष्ठ जेवणाची मेजवानी करण्यात येते. यासाठी अनेक जण प्रचंड खर्च करतात. पण, इस्लापूरच्या एका 14 वर्षीय मुली काल (दि. 11 एप्रिल) आपला वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार बुडाले आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. या काळात सर्वजणच आपापल्या परिने मदत करत आहेत. अशीच एक मदत इस्लामपूर येथील सई विनोद मोहिते हिने आपल्या 14व्या वाढदिवसानिमित्त केली आहे.

बोलताना सई मोहिते आणि रणजीत शिंदे

इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हॉटेल पंगतमध्ये शिवभोजन थाळी मिळत आहे. येथे दररोज गरजू नागरिक शिवभोजन थाळीचे पार्सल घेण्यासाठी येत असतात. यात अनेक जण अत्यंत गरीब आहेत. त्यांच्याकडे जेवण घेण्यासाठी अवघे पाच रुपयेही नसतात. ही गरज ओळखत सईने वाढदिवसाचे निमित्त साधत 400 जणांच्या थाळीचे पैसे जमा करून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून तो गरजूंसाठी करावा, तिला असे वाटत होते.

हातावर पोट असणारे, भीक्षेकरी, भटकंती करणाऱ्या लोकांकडे अवघे 5 रुपये ही नसतात. हे कळाल्यावर तिने आपल्या वाझदिनाच्या खर्चाला फाटा देत शिवभोजन योजनेच्या माध्यमातून तिच्याकडील उपलब्ध असणाऱ्या खर्चातून 400 थाळीचे पैसे जमा केले. तिची ही कल्पना ऐकल्यानंतर इस्लामपूर येथील मुक्तांगणच्या संचालक असणाऱ्या तिच्या आई र्षाराणी मोहिते, वडील विनोद मोहिते व आजी सरोजिनी मोहिते यांनीही मदत केली.

हा उपक्रम राज्याला पथदर्शी ठरेल. सईप्रमाणेच सर्वांनी आपापल्या परिने मदत केली पाहिजे, असे मत केंद्र संचालक रणजीत शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - सांगली धान्‍य वाटपामध्‍ये राज्‍यात अग्रेसर... सहा दिवसात 3 लाख जणांना धान्य वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.