ETV Bharat / state

कडेगाव तालुक्यातील १० वर्षीय मुलाला कोरोनाची लागण, कोरोनाबाधिताच्या आला होता संपर्कात - 10 year old tested corona positive

कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील एका १० वर्षीय मुलाला कोरोना लागण झाली आहे. खानापूर तालुक्यातल्या साळशिंगे येथील गुजरातच्या अहमदाबादहुन आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात हा मुलगा आला होता. आपल्या आई वडिलांबरोबर त्याने सळशिंगच्या कोरोनाबाधित महिलेसोबत एकाच गाडीतून प्रवास केला होता.

१० वर्षीय मुलाला कोरोना लागण
१० वर्षीय मुलाला कोरोना लागण
author img

By

Published : May 15, 2020, 3:10 PM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. एका १० वर्षीय मुलाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील हा मुलगा असून तो गुजरातहुन सांगलीच्या साळशिंगमध्ये आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला होता.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून बाधितांचा आकडाही वाढत आहे. कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील एका १० वर्षीय मुलाला कोरोना लागण झाली आहे. खानापूर तालुक्यातल्या साळशिंगे येथील गुजरातच्या अहमदाबादहुन आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कात हा मुलगा आला होता. आपल्या आई वडिलांबरोबर त्याने सळशिंगच्या कोरोनाबाधित महिलेसोबत एकाच गाडीतून प्रवास केला होता.

१० मे रोजी साळशिंगच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कातील आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये भिकवडीच्या पती-पत्नी व त्यांच्या मुलाला क्वारंटाईन करत कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट हे शुक्रवारी प्राप्त झाले असून यातील १० वर्षीय मुलाला कोरोना लागण झाली आहे. सध्या त्याच्यावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे. तर, सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १४ वर पोहचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.