ETV Bharat / state

विवेक सोहनींना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून 'आंतरराष्ट्रीय पंच' पदवी प्रदान - Vivek Sohani International Arbiter

विवेकने आर्बिटर्सकरीता उपयुक्त अशी तीन सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत. 'त्या'बद्दल त्यांचे अनेक नामवंतांनी कौतुकही केले आहे. विवेक यांनी आंतरराष्ट्रीय पंच पदवीकरिता आवश्यक असलेले चार नॉर्म्स आयआयएफएल (IIFL) मुंबई, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा, मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा आणि गोव्याच्या ग्रँडमास्टर स्पर्धांमध्ये काम करून मिळवले आहे.

विवेक सोहनींना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून 'आंतरराष्ट्रीय पंच' पदवी प्रदान
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:13 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील विवेक सोहनी यांची ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच विवेक यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मिटिंग हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विवेक यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आले. दरम्यान, विवेक दक्षिण महाराष्ट्रातून अशी कामगिरी करणारे पहिलेच ठरले आहेत.

रत्नागिरी येथील संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमधून पंच म्हणून काम करत असताना, विवेक यांना रत्नागिरीच्या चैतन्य भिडे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१६ साली नागपूर येथे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विवेकने संपूर्ण देशात आठवा क्रमांक मिळवत या यशाची पायाभरणी केली. पुढे २०१७ साली दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बीटर परीक्षेत विवेकने अव्वल स्थान मिळवले. तसेच त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करताना फिडे आर्बीटर हे टायटलही मिळवले.

विवेकने आर्बिटर्सकरीता उपयुक्त अशी तीन सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत. 'त्या'बद्दल त्यांचे अनेक नामवंतांनी कौतुकही केले आहे. विवेक यांनी आंतरराष्ट्रीय पंच पदवीकरिता आवश्यक असलेले चार नॉर्म्स आयआयएफएल (IIFL) मुंबई, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा, मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा आणि गोव्याच्या ग्रँडमास्टर स्पर्धांमध्ये काम करून मिळवले आहे.

याच कामगिरीची दखल घेत जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्यांच्या आंतरराष्ट्रीय पंच (International Arbiter) पदवीवर शिक्कामोर्तब केले. तसेच या कामगिरीच्या जोरावर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. विवेक यांनी आपल्या ३ वर्षांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करून सर्वत्र नावलौकिक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा - विराटला आली धोनीची आठवण, 'या'साठी रोहित शर्माकडे मागितली मदत

हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

Intro:विवेक सोहनी यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून आंतरराष्ट्रीय पंच पदवी प्रदान

८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट येथे पदवी वर शिक्कामोर्तब

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीच्या विवेक सोहनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्रातून अशी कामगिरी करण्याचा पहिला बहुमान विवेक सोहनी यांना मिळाला आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मिटिंग ७ व ८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट, हंगेरी येथे संपन्न झाली. सदर मिटिंगमध्ये हा निर्णय झाला.
चेसमेन रत्नागिरी या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमधून पंच म्हणून काम करत असताना विवेकला रत्नागिरीच्या चैतन्य भिडे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१६ साली नागपूर येथे झालेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विवेकने संपूर्ण देशात आठवा क्रमांक मिळवत या यशाची पायाभरणी केली. पुढे २०१७ साली दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बीटर परीक्षेत विवेकने अव्वल स्थान मिळवले. तसेच त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करता करता फिडे आर्बीटर हे टायटलही मिळवले.
विवेकने आर्बिटर्सकरीता उपयुक्त अशी तीन सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत आणि त्याबद्दल त्याचे अनेक नामवंतांनी कौतुकही केले आहे. आंतरराष्ट्रीय पंच पदवी करीता आवश्यक असलेले चार नॉर्म्स विवेकने IIFL मुंबई - आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा, मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा आणि गोव्याच्या ग्रँडमास्टर स्पर्धांमध्ये काम करून मिळवले. या कामगिरीची दखल घेत जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्यांच्या आंतरराष्ट्रीय पंच (International Arbiter) पदवीवर शिक्कामोर्तब केले. तसेच या कामगिरीच्या जोरावर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
विवेकला त्याच्या ह्या वाटचालीत कोल्हापूरच्या भरत चौगुले यांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले. पुण्याचे नितीन शेणवी व राजेंद्र शिदोरे तसेच मुंबईचे विठ्ठल माधव यांचे मार्गदर्शन विवेकला मिळाले. तर दिल्लीचे गोपाकुमार, नागपूरचे स्वप्नील बनसोड, चेन्नईचे आर. अनंतराम व आनंद बाबू आणि कर्नाटकच्या वसंत बी. एच. यांच्याकडून विवेकने पंच म्हणून काम करताना लागणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर, इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स सेटप करण्यापासून त्यावरून चालू गेम्स इंटरनेटवर कसे ट्रान्समीट करावे अशा निरनिराळ्या तांत्रिक गोष्टी आत्मसात केल्या. आजवर त्याने ह्या छोट्याशा तीन वर्षांच्या कारकिर्दीत ५० हुन अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करून सर्वत्र नावलौकिक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.Body:विवेक सोहनी यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून आंतरराष्ट्रीय पंच पदवी प्रदान

८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट येथे पदवी वर शिक्कामोर्तबConclusion:विवेक सोहनी यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून आंतरराष्ट्रीय पंच पदवी प्रदान

८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट येथे पदवी वर शिक्कामोर्तब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.