रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे हरेकर वाडी स्टॉपच्या समोरील झाडीत एक बैल मृतावस्थेत आढळला. या बैलाची हत्या झाली असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. बैलाच्या शरीरावर धारधार शस्त्राने वार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता, यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.