ETV Bharat / state

रत्नागिरीत वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद; 6 दुचाकींसह 2 सायकली हस्तगत - वाहन चोरी रत्नागिरी

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सलग तीन ते चार दिवस साध्या वेशात शहरात गस्त घातली. त्यांना 26 नोव्हेंबरला नाचणे रोडवर दोन मोटारसायकलसह चार संशयास्पद व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा उघड झाला. आरोपींच्या ताब्यातून 6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

theft
रत्नागिरीत वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद
author img

By

Published : Nov 27, 2019, 10:49 PM IST

रत्नागिरी - शहरासह परिसरात मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून 6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत

आरोपी यश राजकुमार शर्मा(वय 19 रा. घुडेवठार), सुरज सुरेश सकपाळ (वय 19 रा. तेली आळी), विघ्नेश देंवेद्र भाटकर(वय 19 वर्षे रा. तोणदे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विषेश मोहिम राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या.

हेही वाचा - दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा 'ताहीर डॉन' अखेर मालेगाव पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सलग तीन ते चार दिवस साध्या वेशात शहरात गस्त घातली. त्यांना 26 नोव्हेंबरला नाचणे रोडवर दोन मोटारसायकलसह चार संशयास्पद व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा उघड झाला. चारही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Intro: मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी शहर आणि परिसरात मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आलं असून यातील एक अल्पवयीन आहे.. या चार जणांच्या ताब्यातुन 03 हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल, 01 पल्सर मोटार सायकल, 01 अपाची मोटार सायकल, 01 बजाज कंपनीची सीटी 100 मोटार सायकल, 02 सायकल तसेच 02 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 1,10,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यश राजकुमार शर्मा, वय-19 वर्षे, रा. घुडेवठार, रत्नागिरी, सुरज सुरेश सकपाळ, वय-19 वर्षे, रा. तेली आळी, रत्नागिरी, विघ्नेश देंवेद्र भाटकर, वय-19 वर्षे, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी अशी या तिघांची नावं आहेत.
रत्नागिरी शहरामध्ये सध्या मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी, चोरीचे प्रमाण वाढल्याने या प्रकारांना प्रतिबंध होणेकरीता व सदरचे गुन्हे उघडकीस येणेकरीता मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करुन त्यांना साध्या वेषामध्ये गस्त ठेवणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे रत्नागिरी शहर परिसरामध्ये सलग तीन ते चार दिवस तपास पथकाचे गस्त घालण्याचे काम सुरु होते. दिनंाक 26/11/2019 रोजी गस्ती दरम्याने रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवर दोन संशयास्पद मोटारसायकल व चार इसम आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून, त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी रत्नागिरी शहर परिसरामध्ये अनेक मोटार सायकल व सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
या चौघांना पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Body:मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगतConclusion:मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.