रत्नागिरी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा आजपासून रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
असा आहे दौरा :
मंत्री नारायण राणे सकाळी १० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, शामराव पेजे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून गोळप येथे आंबा प्रक्रिया उद्योजक विजय देसाई फॅक्टरीला भेट देतील आणि आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग, काजू उत्पादक प्रतिनिधींशी चर्चा करतील. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ११.३५ च्या दरम्यान दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात राणे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी १२.१५ ते १ वाजेपर्यंत विविध प्रतिनिधी मंडळे मंत्री राणे यांची भेट घेऊन स्वागत करणार आहेत.
हेही वाचा - राज्यपालांकडून आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटीकरिता 1 सप्टेंबरची वेळ; 12 आमदारांचा सुटणार तिढा?
तर दुपारी १ वाजता श्री. राणे लोकमान्य टिळक जन्मस्थानाला भेट देणार आहेत. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर कुवारबाब भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट व लाभार्थी नागरिकांची भेट घेऊन राणे लांज्याकडे रवाना होतील. तिथे भाजप कार्यकर्ते त्यांचा सत्कार करणार आहेत. तर राजापूरलाही कार्यकर्ते राणे यांचा सत्कार करणार आहेत.