रत्नागिरी - राहुल गांधीला सांगू इच्छितो येथे नामर्द जन्माला येऊ शकत नाहीत. हा हिंदूस्थान आहे. इटली नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली. सावरकरांवर राहुल गांधींनी हिणकस पद्धतीने टीका केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी गुहागर येथे घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, की ज्यांनी देशासाठी हौतात्म पत्करले आहे. ते आम्ही विसरू शकत नाही. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यांसाठी जे काय केले त्यांचा आम्हाला आदर आहे. परंतु सावरकरांवर टीका करणे योग्य नाही. सावरकारांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. सावरकर आणि त्यांचे बंधू एकाच तुरुंगामध्ये होते. परंतु त्यांना माहित नव्हते. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केल्याची टीका यावेळी ठाकरे यांनी केली.
कोकणात प्रदूषणककारी प्रकल्प येणार नाहीत, त्याला शिवसेनेचा यापुढेही कायम विरोध राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.