रत्नागिरी - राजापूर तालुक्यात मंगळवारी (दि. 7) झालेल्या एका अपघातात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्या आहे. हा अपघात बाकाळे येथे झाला. दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तुलसीकुमारी कवली शिकारी ( वय 14 वर्षे ) व आराध्या अनिल राठोड ( वय 5 वर्षे), अशी अपघातात मृत्यू झालेल्या मुलींचे नावे आहे.
याबाबत नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुपारी सव्वा एकच्या आसपास जेवण आटोपून डबे घेऊन आपल्या झोपडीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तुलसीकुमारी व आराध्या उभ्या होत्या. यावेळी जैतापूरकडून देवगडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ( क्र. एम. एच . 07 एक्स 1572)ने भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात दोघींना ठोकरले. यात तुलसीकुमारी शिकारी हिचा जागीत मृत्यू झआला तर आराध्याला जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना वाटेत तिचा मृत्यू झाला. तर शिल्पा सुरेश राठोड ( वय 20 वर्षे), सुनिता सुरेश राठोड ( वय 35 वर्षे, सर्व रा. विजापूर, कर्नाटक राज्य) या जखमी झाल्या आहेत. अधिक उपचारासाठी दोघींना रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे.
आरोपी अटकेत
या प्रकरणी टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात भा.दं.वी.चे कलम 304अ,279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 134/177,184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा - पूरमुक्त चिपळूणसाठी चिपळूणकरांचा लढा, आजपासून साखळी उपोषण