रत्नागिरी - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र या आदेशाविरोधात स्थानिक व्यापारी आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी आज आपली दुकानं बंद ठेवत, दुकानांसमोर निषेधाचे फलक हातात धरून या लॉकडाऊनचा निषेध केला.
व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊनचा निषेध
अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या आदेशाविरोधात रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा आक्रोश आज पाहायला मिळाला. रत्नागिरी व्यापारी महासंघाने या बंद विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. रत्नागिरीतील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली. मात्र सर्व व्यापाऱ्यांनी हातात निषेधाचा फलक घेऊन, शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. अनेक दुकानदारांनी दुकानावर निषेधाचे बोर्ड झळकावले. रत्नागिरीतल्या मुख्य बाजारपेठेत लॉकडाऊनच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, याचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
हेही वाचा - इथे मृत्युही ओशाळला! अंबाजोगाईत एकाच चितेवर ८ जणांवर अंत्यसंस्कार, दुसऱ्यांदा घडली घटना