रत्नागिरी - जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्ण कोरोना मुक्त होण्याच्या दरात वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या बाबतीत समाधानाची बाब आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल ७९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर ६६२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यात आता एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १९ हजार १९० झाली आहे. तर शुक्रवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ हजार ९३८रुग्ण उपचाराखाली आहेत.
६६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार ६६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २५,९०१ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत, तर आज ७९६ जण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १९ हजार १९० झाली आहे. दिवसभरात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ७७३ झाली आहे.
शुक्रवारी दिवसभरात पॉझिटिव्ह सापडलेल्या ६६२ रुग्णांमध्ये रत्नागिरी २४८ , दापोली २१, खेड ७१, गुहागर ५२, चिपळूण १६४, संगमेश्वर ३७४ , मंडणगड ५, लांजा ५५ , राजापूर ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.