रत्नागिरी - मुंबईतील थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊन देखील मुंबईत काही ठिकाणी थिएटर सुरू ठेवण्यात आले आहेत. कोणी आदेश देऊनही थिएटर सुरू ठेवत असतील तर राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - '..आता चुकीला माफी नाही! कारण.. 'उजव्या कानाला मी अन् डाव्या कानाला बाळासाहेब'
कोरोनाचे संकट हे देशावर आलेले संकट असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन संपवतोय. कोरोनाबाबत घाबरून जाऊ नका. गर्दीचे प्रसंग टाळावेत, गर्दीपासून लांब राहावे, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांबाबत देखील राज्य सरकार विचार करून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.