ETV Bharat / state

कारागृहातून पळालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश

आरोपी रुपेश तुकाराम कुंभारला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यापुर्वी हा आरोपी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत होता. त्यानंतर त्याला 27 ऑक्टोबर 2018 पासून रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये उर्वरीत शिक्षा भोगणेकरीता आणण्यात आले.

आरोपी रुपेश तुकाराम कुंभार
author img

By

Published : Jun 18, 2019, 11:55 PM IST

Updated : Jun 19, 2019, 12:03 AM IST

रत्नागिरी - कारागृहातून पळालेल्या आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. रुपेश तुकाराम कुंभार असे आरोपीचे नाव आहे. तो 302 च्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. रत्नागिरी कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र, रुपेश 11 जून रोजी रत्नागिरी जिल्हा विशेष (खुले) कारागृहातून पळून गेला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारागृहातून पळालेला आरोपी अखेर जेरबंद

302 या गुन्ह्यामधील आरोपी रुपेश तुकाराम कुंभार (वेळंब, ता.गुहागर) याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. यापूर्वी हा आरोपी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत होता. त्यानंतर त्याला 27 ऑक्टोबर 2018 पासून रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये उर्वरित शिक्षा भोगण्याकरीता आणण्यात आले. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हा विशेष कारागृहात शिक्षा भोगत असताना जिल्हा विशेष (खुले) कारागृहातून तो 11 जून रोजी पळून गेला.

त्याच्या शोधाकरिता पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खास पथक तयार करण्यात आले. दरम्यान हा आरोपी पळून जाण्यापूर्वी त्याला कारागृहात भेटावयास आलेले नातेवाईक व मित्र यांचेबाबत कारागृह प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती घेऊन त्यांचेशी समन्वय ठेवण्यात आला. दरम्यान चिपळूण तालुक्यातील परशुराम, लोटे, पेढे, धामणदेवी या परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. संबंधित माहितीच्या आधारे पथकाने या परिसरातील गावे व जंगल भागात फिरुन 3 दिवस अहोरात्र माहिती घेण्यात आली. परंतु, त्याचा ठिकाणा मिळत नव्हता. अखेर मंगळवारी रुपेश कुंभार पेढे इथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आता पुढील कार्यवाहीकरीता त्याला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासने, स.पो.फौ. सुभाष माने, पो.हे.कॉ. संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, मिलींद कदम, आशिष शेलार, विजय आंबेकर, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी केली आहे.

Intro:कारागृहातून पळालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी - प्रतिनिधी

कारागृहातून पळालेल्या आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रुपेश तुकाराम कुंभार असं या आरोपीचं नाव आहे, तो 302 च्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. रत्नागिरी कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र रुपेश 11 जून रोजी रत्नागिरी जिल्हा विशेष (खुले) कारागृहातून पळून गेलेला होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
302 या गुन्हयामधील आरोपी रुपेश तुकाराम कुंभार (वेळंब, ता.गुहागर) याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. यापुर्वी हा आरोपी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत होता. त्यानंतर त्याला 27 ऑक्टोबर 2018 पासून रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये उर्वरीत शिक्षा भोगणेकरीता आणण्यात आलं होतं. मात्र रत्नागिरीच्या जिल्हा विशेष कारागृहात शिक्षा भोगत असताना जिल्हा विशेष (खुले) कारागृहातून तो 11 जून रोजी पळून गेला होता. त्याच्या शोधाकरीता पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खास पथक तयार करण्यात आलं होतं.. दरम्यान हा आरोपी पळून जाणेपुर्वी त्याला कारागृह या ठिकाणी भेटावयास आलेले नातेवाईक व मित्र यांचेबाबत कारागृह प्रशासनाकडून परिपुर्ण माहीती घेवून त्यांचेशी समन्वय ठेवण्यात आला. दरम्यान चिपळुण तालुक्यातील पर्शुराम, लोटे, पेढे, धामणदेवी या परिसरात असल्याबाबतची माहीती प्राप्त झाली होती.या माहितीच्या आधारे या पथकाने या परिसरातील गावे व जंगलमय भागात फिरुन 3 दिवस अहोरात्र माहीती घेण्यात येत होती. परंतु त्याचा ठिकाणा मिळून येत नव्हता. अखेर आज रुपेश कुंभार हा पेढे या ठिकाणी असल्याबाबतची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं. आता पुढील
कार्यवाहीकरीता त्याला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, सपोफौ सुभाष माने, पोहेकॉ संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, मिलींद कदम, आशिष शेलार, विजय आंबेकर, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी केली आहे.Body:कारागृहातून पळालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यशConclusion:कारागृहातून पळालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश
Last Updated : Jun 19, 2019, 12:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.