गुहागर (रत्नागिरी) गुहागर तालुक्यातील सुरळ मोहल्ला येथील सार्वजनिक विहीरीमध्ये बिबट्या पडला होता. सुरळचे सरपंच यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वनपाल संतोष परशेटे यांना दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी दिपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अधिकारी आर. आर. पाटील, वनपाल परशेट्ये, देवरूखचे वनपाल उपरे, वनपाल रामदास खोत, वनरक्षक मांडवकर, शिंदे, बंबर्गेकर पिंजऱ्यासह सुरळ गावात दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला दोरीच्या साह्याने विहिरीमध्ये फळी सोडण्यात आली. अथक प्रयत्नांनतर बिबट्या पिंजऱ्यात शिरला. त्यांनतर त्याला पिंजऱ्यासह विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
बिबट्याची होती दहशत
१० दिवसांपूर्वी वेळणेश्वर - वाडदई खालचीवाडी येथील गोठ्यातील बैल बिबट्याने मारला होता. तर शनिवारी २० फेब्रुवारीला संगीता भिकू गावणंक यांच्याच गोठयातील गाय बिबट्याने मारली होती. दरम्यान पिंपर परिसरातील लोकवस्तीतही काही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिलं होतं. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत आहे.
विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून जीवनदान देण्यात वनविभागाला यश - Ratnagiri leopard news