रत्नागिरी - तुम्ही एका केंद्रीय मंत्र्याला जेवण करता करता अटक करता आणि आता कोणत्या तोंडाने बोलू शकता ही आकसाने कारवाई झालीय म्हणून ? असा सवाल करत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर नवाब मलिक यांच्या अटकेवरून टीकास्त्र सोडले आहे. (Vinayak Mete Press Conference) ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसंग्रामचे राष्ट्रीय सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते.
करावे तसे भरावे, जर त्यांनी काही केले असेल तर सजा भोगली पाहिजे, आणि काही केले नसेल तर बाहेर येतील. केंद्र सरकारवर हे टीका करतात हा अत्यंत दुतोंडीपणाचा कळस आहे. तुम्ही याच राज्यामध्ये एका केंद्रीय मंत्र्याला जेवण करता करता अटक करता आणि कोणत्या तोंडाने बोलू शकता ही आकसाने कारवाई झालीय म्हणून असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांनी काही केलं असेल तर त्याची फळं ते भोगतील आणि नसेल काही केलं तर तावूनसुलाखून त्यातून बाहेर येतील असही मेटे यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - Russia-Ukraine crisis : पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले, लष्करी मोहिमेची घोषणा