ETV Bharat / state

Terrible accident in Amba Ghat : आंबा घाटात भीषण अपघात! २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा मृत्यू

आंबा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबाची गाडी तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळून २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. (Terrible accident in Amba Gha) तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटातील गायमुख जवळ हा अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला. (KA 32 Z 0949) हा गडी क्रमांक आहे.

आंबा घाट
आंबा घाट
author img

By

Published : Mar 11, 2022, 6:54 AM IST

रत्नागिरी - रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबाची गाडी तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळून २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटातील गायमुख जवळ हा अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला. (KA 32 Z 0949) हा गडी क्रमांक आहे. (Terrible accident in Amba Ghat) घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. (Terrible accident Ratnagiri Kolhapur Marg) दरम्यान, मदतीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकही येथे जमा झाले होते.

सहाजण गंभीर जखमी

खोल दरी व जंगल असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र, मोठ्या जिगरिने खोल दरीत गाडी कोसळलेल्या ठिकाणी हे तरुण पोहचले. यावेळी शिवांश हरकुडे (२ महिने), सृष्टी संतोष हरकुडे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी २ महिनाच्या बाळाचा मृतदेह पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुळारे, तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. १०८ ॲम्बुलन्स, नरेंद्र महाराज संस्थान ॲम्बुलन्स घटनास्थळी बचावकार्यात मदत करत होत्या. यावेळी जय शिवराय मित्रमंडळ, राजू काकडे हेल्प अँकॅडमी, आंबा घाटातील स्थानिक नागरिक यांनी बचावकार्यात केलेल्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.

देवदर्शनासाठी गणपतीपुळे इथे निघालं होतं कुटुंब

अपघातग्रस्त झालेले कुटुंबीय सांगली विश्राम बाग येथील होते. देवदर्शनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी निघाले होते.मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडला असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला. याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी स्विफ्ट गाडीचा अपघात घडला होता, यामध्ये एका वृद्धाला जीव गमवावा लागला होता.

हेही वाचा - UK Election Result 2022 : वडिलांचा झाला होता पराभव, त्याच मतदारसंघातून मुलींनी मारली बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.