ETV Bharat / state

वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण, ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस

गेले आठवडाभर वातावरण काहीसे ढगाळ असून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह काही ठिकाणी पाऊसही झाला आहे.

रत्नागिरी तापमान १
author img

By

Published : Apr 30, 2019, 10:56 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील तापमान कमाल ३६ ते किमान ३१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेले आठवठाभर कमाल तापमान ३२ ते ३६ दरम्यान राहिले आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत आणखीन वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

रत्नागिरी तापमान

गेले आठवडाभर वातावरण काहीसे ढगाळ असून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह काही ठिकाणी पाऊसही झाला आहे. वाढत्या उन्हामुळे घराबाहेर पडल्यानंतर वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. दुचाकी चालवताना महिला स्कार्फचा वापर करत आहेत. तर, पुरुषही तोंडाला रुमालाचा वापर करताना दिसत आहे. तर, काहीजण छत्रीचाही वापर करत आहेत.

कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत आणि ज्यूस यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कलिंगड आणि काकडीला मागणी सध्या मोठी आहे. पाणी थंड ठेवण्यासाठी माठाला सुद्धा मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, अन्य विभागाच्या तुलनेत कोकणातील तापमान थोडे कमी असल्याने अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत.

Intro:चढलेल्या पाऱ्यामुळे नागरीक हैराण
वातावरणातही बदल, जिल्ह्यात ढगाळ वातावरण

रत्नागिरी, प्रतिनिधी

गेले काही दिवस वाढलेल्या पाऱ्यामुळे जिल्ह्यातील जनता चांगलीच त्रस्त झाली आहे.. जिल्ह्यातील तापमान कमाल 36 ते किमान 31 अंशांपर्यंत पोहोचले आहे.. गेले आठवठाभर कमाल तापमान 32 ते 36 दरम्यान राहिलं आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत आणखीनच वाढ झाली आहे. गेले आठवडाभर वातावरण काहीसे ढगाळ असून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
वाढत्या उष्म्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर या वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.. दुचाकी चालवताना महिला विशेषतः स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत.. तर पुरूषही तोंडाला रुमालाचा वापर करताना दिसत आहे.. तर पावसाळयात दिसणारी छत्रीही अनेकांच्या डोक्यावर पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे घशाला पडलेली कोरड शमवन्यासाठी कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत, ज्यूस यांना मागणी वाढल्यची दिसून येते. कलिंगड आणि काकडीला मागणी सद्ध्या मोठी आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणार्या माठाला सुद्धा मागणी वाढल्याचं पहायला मिळत आहे..
दरम्यान अन्य विभागाच्या तुलनेत कोकणातील तापमान थोडं कमी असल्याने अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत..Body:चढलेल्या पाऱ्यामुळे नागरीक हैराण
वातावरणातही बदल, जिल्ह्यात ढगाळ वातावरणConclusion:चढलेल्या पाऱ्यामुळे नागरीक हैराण
वातावरणातही बदल, जिल्ह्यात ढगाळ वातावरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.